Maharashtra Weather Update: राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मधील काही भागात रेड अलर्ट
हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस विश्रांतीवर आहे. मात्र, आता पुन्हा मान्सून राज्यात सक्रीय होणार असल्याचं हवामान विभागाने(Weather Forecast) सांगितलं आहे. राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला पावसाचा जोर (Heavy Rain Alert)असणार असल्याचं सांगितलं जात आहे. हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज रेड (Red Alert)आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. (हेही वाचा:Maharashtra Rain Alert: राज्यात बहुतांश जिलह्यांना पावसाचा अलर्ट; मराठवाडा-विदर्भात तुफान पावसाचा हवामान भागाचा अंदाज )
गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पावसाची हजेरी गणेशभक्तांना आनंददायी ठरणार आहे. हवामान विभागाकडून राज्याच सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यानंतर कच्छच्या किनारी पट्ट्यावर अरबी समुद्रात झेपावेल्यानंतर त्याचं चक्रीवादळात रूपांतर झालं. शनिवारी मध्यरात्री ओमानच्या किनार पट्टीवर हे वादळं धडकलं होतं. या चक्रीवादळाचा मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं.
घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज
पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात 4 सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे 2 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा राज्याच्या धरणांतून जलविसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावर राहणाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भातील 18 जिल्ह्यांमध्ये तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान आणि संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत सोमवारी 2 सप्टेंबर रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता (Weather) हवामान विभागाने वर्तवविलेली आहे.