Jalna Accident: जालना-वडीगोद्री रोडवर ट्रक आणि MSRTC बसची जोरदार धडक; 6 ठार, 18 जखमी (Watch Video)

या भीषण अपघातात 6 ठार तर 18 जण जखमी झाले.

MSRTC Bus Accident in Jalna (फोटो सौजन्य - @ians_india)

Jalna Accident: जालना जिल्ह्यातून (Jalna District) मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी सकाळी आयशर ट्रक आणि एमएसआरटीसी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस (MSRTC Bus) यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 6 ठार तर 18 जण जखमी झाले. जालना-वडीगोद्री रोडवर (Jalna-Wadigodri Road) शहापूर गावाजवळ (Shahapur Village) सकाळी आठच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला.

प्राप्त माहितीनुसार, MH20BL 3573 क्रमांकाची बस गेवराईहून जालन्याकडे जात होती. या बसमध्ये एका लहान मुलासह 25 प्रवासी होते. तथापी, एमएच 01 सीआर 8099 क्रमांकाचा ट्रक अंबड येथून संत्री घेऊन जात होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहाव्या पीडित व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. (हेही वाचा -Mumbai Pune ExpressWay Accident: मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर तीन वाहनांच्या धडकेत भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू)

जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली. (हेही वाचा - (हेही वाचा- चुकीच्या बाजूने येणाऱ्या SUV च्या धडकेत 23 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू; पाहा व्हिडिओ)

जालना-वडीगोद्री रोडवर MSRTC बस आणि ट्रकचा अपघात, पहा व्हिडिओ - 

दरम्यान, बचाव कार्यात मदत करण्यासाठी आणि रुग्णवाहिकेद्वारे जखमींना घेऊन जाण्यासाठी पोलीस आणि वाहतूक युनिट तातडीने घटनास्थळी पोहोचले. या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जालना-वडीगोद्री रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.