Heart Blockage Pune: नवऱ्याच्या टोमण्यांमुळे हृदयात ब्लॉकेज, महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
पुणे (Pune Police) येथील धनकवडी येथील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये (Sahakar Nagar Police Station) ही तक्रार दाखल झाली आहे.
पुणे (Pune) येथील महिलेने आपला पती (Husband Wife Relationship) आणि सासरच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीचे कारण पाहून पोलीसही चक्रावले आहेत. पती आणि सासरकडच्या मंडळींनी मारलेल्या सततच्या टोमण्यांमुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे (Taunts, Mental and Physical Harassment) आपल्या हृदयात ब्लॉकेज तयार झाल्याचा दावा तक्रारदार महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. पुणे (Pune Police) येथील धनकवडी येथील सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये (Sahakar Nagar Police Station) ही तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिलेने तक्रारीत हा सर्व प्रकार जुलै 2021 ते मार्च 2023 या काळात घडल्याचा दावा केला आहे. तक्रारदार महिला ही प्रतीक चोथे नामक इसमाची पत्नी आहे. प्रतीक आणि तक्रारदार महिला यांचा विवाह 2021 मध्ये झाला. लग्नानंतर ही महिला पतीसोबत राहू लागली. मात्र या काळात पती आणि साररच्या मंडळींकडून आपला सातत्याने त्रास होऊ लागला. सातत्याने टोमणे, मानसिक त्रास, हिण वागूणक यांद्वारे आपला मानसिक छळ करण्यात आला. या त्रासामुळेच माझ्या हृदयात ब्लॉकेज आढळल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरुन पुण्यातील सहकारनगर पोलीसांनी प्रतीक चोथे, दिलीप चोथे, अंजली क्षीरसागर, वैशाली शिंदे, विद्या भगत, रुपाली तोडमल अशा सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला धनकवडी परिसरात राहते. (हेही वाचा, Husbands Swapping: नवरा पळविणाऱ्या बाईच्या नवऱ्यासोबत संसार थाटत बायकोने घेतला बदला; प्रेम की Wife Swapping? समाज चक्रावला)
दरम्यान पाठिमागील अनेक वर्षांपासून कौटुंबीक हिंसाचार हा मुद्दा ऐरणीचा बनला आहे. कौटुंबिक हिंसाचार यामध्ये शारीरिक, लैंगिक, भावनिक आणि मानसिक शोषणासह अनेक प्रकार घेऊ शकतात. यात मारणे, मुक्का मारणे, थप्पड मारणे, लाथ मारणे, गुदमरवणे, मानसिक खच्चीकरण करणे किंवा पीडिताविरुद्ध शस्त्रे वापरणे यासारख्या वर्तनांचा समावेश असू शकतो. यात शाब्दिक शिवीगाळ, धमक्या, धमकावणे, वाळीत टाकणे, पाठलाग करणे आणि पीडितेचे आर्थिक नियंत्रण यांचा समावेश असू शकतो.
घरगुती हिंसा ही एक गंभीर आणि व्यापक समस्या आहे जी सर्व लिंग, वयोगट, वंश आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीच्या लोकांना प्रभावित करते. शारीरिक दुखापत, भावनिक आघात आणि मृत्यू यासह पीडितांसाठी त्याचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात. पीडितांसाठी प्रशिक्षित व्यावसायिकांकडून मदत आणि समर्थन घेणे आणि समाजाने घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी आणि समाप्त करण्यासाठी कार्य करणे महत्वाचे आहे.