Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये 18 जुलै ला सुनावणी

पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात या पालिका निवडणूकांचे पडघम वाजू शकतात असा सध्या अंदाज आहे.

Local Body Elections: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये 18 जुलै ला सुनावणी
Supreme Court

महाराष्ट्रामध्ये मुंबई सह पुणे, नाशिक सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका (Local Body Elections) प्रलंबित आहेत. या निवडणूकांबाबर सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या सुनावणीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. 10 एप्रिल नंतर आता या प्रकरणावर आता 18 जुलै दिवशी सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखाली त्याची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश त्रिसदस्यीय खंडपीठासह याप्रकरणी पुढील सुनावणी करणार आहेत.

सध्या महाराष्ट्रामध्ये 25 पेक्षा अधिक महापालिका, 207 नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे. 92 नगरपरिषदांमधला ओबीसी आरक्षणाचं काय होणार? वेळोवेळी जाहीर केलेले अध्यादेश, शिंदे फडणवीस सरकारने नव्याने प्रभागरचना करण्यासंदर्भातील जारी केलेले अध्यादेश या सगळ्यांवर 18 जुलै रोजी एकत्रित सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रात कोविड संकटादरम्यान अनेक महानगरपालिकांचा कार्यकाळ संपला त्यानंतर दीड दोन वर्ष प्रशासकाच्या हातात मुंबई, पुणे, नाशिक महानगरपालिकांचा कारभार देण्यात आला आहे. आता हा कारभार पुन्हा नगरसेवक आणि महापौरांच्या हातात देण्यासाठी निवडणूका आवश्यक आहेत. त्यामुळे अनेक महानगरांमध्ये पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा आहे.

पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात या पालिका निवडणूकांचे पडघम वाजू शकतात असा सध्या अंदाज आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2023 09:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).