Mumbai News: पैशांचं आमिष दाखवून पोलिस मित्राची केली फसवणूक, 36 लाखांचा लावला गंडा

एका पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या मित्राने पैशांच आमिष दाखवून खोट्या आश्वसनावर एका प्रकल्पात पैसे गुंतवण्यास (Investment) प्रवृत्त केले या दरम्यान पोलिस कर्मचाऱ्याने 36 लाख रुपये गमावले.

Fraud (Photo Credits: IANS) | Representational Image

 Mumbai News:  एका पोलिस कर्मचाऱ्याला त्याच्या मित्राने पैशांच आमिष दाखवून खोट्या आश्वसनावर एका प्रकल्पात पैसे गुंतवण्यास (Investment) प्रवृत्त केले या दरम्यान पोलिस कर्मचाऱ्याने 36 लाख रुपये गमावले. पैशाचे आमिष बघून पोलिस कर्मचाऱ्याने नातेवाईक आणि मित्रांकडून कर्ज घेतले. त्याला कोणताही पैशा न मिळाल्याने त्यांने वांद्रे पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार केली. आप्पासाहेब बिराजदार हा पोलिस शिपाई वांद्रे पश्चिम येथील पोलस क्वार्टरमधील रहिवासी आहे. (हेही वाचा- चेंबूर येथे लाच घेताना रंगेहात पकडलं, तीन पोलिसांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2022 मध्ये, पाली हिल येथील रहिवासी असलेल्या राजेश छापेकर (29) या व्यक्तीने आपल्या बॉस रवी जयसिंग आणि त्यांची पत्नी मोनिषा जयसिंग यांनी गुंतवणुकीसाठई वंदन प्रकल्प सुरु केल्यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला आप्पासाहेब यांनी नकार दिला पण कालावधीनंतर त्यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली. एका महिन्यानंतर ते वांद्रे पश्चिम येथील गोकुळ हॉटेलमध्ये भेटले, त्यांना सर्व प्रकल्पाची माहिती दिली. जयसिंग सीमाशुल्क विभागासोबत मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत असल्याचे नमूद केले. आप्पासाहेप यांनी नकार देऊनही त्याच्यावर कर्ज घेण्यास दबाब टाकला.

छापेकर यांनी 35 ते 40 लाख रुपयांची गुंतवणुक करण्याचे आप्पासाहेबांना दबाव दिला. सहा महिन्यात पैसे परत देण्याच आश्वासन दिले. ्छापेकर यांनी 35 ते 40 लाख रुपयांची गुंतवणुकीची श्रेणी सुचवली आणि सहा महिन्यांत परतावा देण्याचे आश्वासन दिले. बिराजदार यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या गुंतवणूकींवर विश्वास ठेवला आणि छापेकर यांच्या इंडसइंड आणि आयसीआयसीआय बँक खात्यांमध्ये १६ लाख रुपये ट्रान्सफर केले. शिवाय बिराजदार यांनी  20 लाख रुपये रोख दिले. त्यानंतर, छापेकर अतिरिक्त गुंतवणुकीची विनंती करत राहिले, जी बिराजदार यांनी नाकारली. बिराजदार यांनी आपल्या मित्राचा आणि बॉसचा अनेक महिने पाठपुरावा केला पण काहीही मिळाले नाही. यावर्षी बिराजदार यांनी गुन्हा दाखल केला.



संबंधित बातम्या