Harshvardhan Patil to join NCP (SP): विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजपाला हर्षवर्धन पाटील यांचा धक्का; इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा

'इंदापूरचा राजकीय वनवास संंपवायचा आहे.' या विचारातून आगामी विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेता पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जात असल्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केला आहे.

Harshavardhan Patil | FB

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची (Maharashtra Vidhan Sabha Election)  घोषणा आता येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता असताना राजकीय वर्तुळात आयाराम-गयारामांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा तगडा सामना लोकसभेमध्ये झाल्यानंतर आता विधानसभेच्या दृष्टीने देखील हालचालींना वेग आला आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट घेतल्यानंतर त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली होती. आज त्यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राम राम करत शरद पवारांची पुन्हा साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांची भेट घेत हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांची लेक अंकिता पाटील यांनीही त्यांचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी आपण भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केले होते.

हर्षवर्धन पाटील विधानसभेच्या रिंगणामध्ये

हर्षवर्धन पाटील यांनी आपली सिल्वर ओक वर शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली आहे. पवारांनीच इंदापूर मध्ये आपण निवडणूक लढावी अशी लोकांची ईच्छा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पवारांनी आपल्यावर निर्णय सोडला असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. यानंतर जनभावनेचा विचार करून  देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आपण बोलून या निर्णयाची माहिती दिली आहे. इंदापूर च्या लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना डावलून पुढे जाणार नाही असं म्हटल्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही माझ्या निर्णयाला अनुमती दिल्याचं हर्षवर्धन पाटील इंदापुरात म्हणाले आहेत.

दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. भाजपा प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील यांना निवडणूकीत यश मिळाले नाही. त्यामुळे आता त्यांनी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यकर्त्यांना सज्जड दम

हर्षवर्धन पाटील यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना या राजकीय घडामोडींमध्ये  कोणावरही टीका न करता, सोशल मीडीया मध्ये माहिती नसताना  काहीही लिहू नका असं म्हणत आगामी विधानसभेच्या कामाला लागा असं म्हटलं आहे. आता इंदापूरचा राजकीय वनवास संंपवायचा आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif