शरद पवार यांचा डाव; भाजपला जोरदार धक्का; दणक्यात Ajit Pawar यांचे टेन्शन वाढलं; आमदार दत्ता भरणे यांच्यापुढे मोठे आव्हान

ज्यामुळे इंदापूरमध्ये भाजपची झोप उडणार आहे. तर अजित पवार यांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासमोरील आव्हान वाढणार आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

''भाजपमध्ये (BJP) गेल्यावर मस्त झोप लागते, ईडी (ED), सीबीआयचे (CBI) टेन्शन नाही'', असे म्हणणारे नेते हर्षवर्धन पाटील ( हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party (SP)) प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पाटील यांच्या मुलाने आणि कन्येने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसलाही तुतारी वाजवणारा माणूस असलेले चित्र ठेवले आहे. जे पवार यांच्या NCP–SP पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. या पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडूनही तूटक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 'ज्यांना विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजप तिकीट देणार नाही, अशी शक्यता वाटते आहे ते लोक पक्ष सोडत आहेत', प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

शरद पवार यांचा भाजपला धक्क्यावर धक्का

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगून उद्धव ठाकरे यांना दिलेल्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन थेट पक्षावरच दावा सांगितला. ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली. पुतण्याचा हा प्रताप शरद पवार यांच्या जिव्हारी लागणे स्वाभाविक होते. मात्र, या प्रकारामुळे हताश न होता पवार यांनी वार्धक्यातही जोमाने प्रयत्न सुरु केले. कंबर कसली आणि ते पक्षबांधणीच्या कामाला लागले. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे काढण्यास सुरुवात केली. ज्याची परिणीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वाढण्यात झाली. हर्षवर्धन पाटील यांचा होऊ घातलेला संभाव्य पक्षप्रवेश ही त्याचीच परिणीती आहे. काही दिवसांपूर्वीच पवार यांनी कोल्हापूरातील भाजप नेते संग्रामसिंह घाटगे यांना पक्षात प्रवेश देत कागल विधानसभा मतदारसंघ जवळपास निश्चित केला. (हेही वाचा, Harshvardhan Patil On BJP: भाजपमध्ये शांत झोप लागते.. कोणतीही चौकशी नाही, काही नाही.. त्यामुळे मी आनंदी- हर्षवर्धन पाटील (Video))

अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज

इंदापूर हा हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. सन 2014 मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र 2014 आणि 2019 अशा सलग दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पाटील यांना त्या वेळी एकत्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय विठोबा भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. आता विधानसभा 2024 मध्ये पाटील हे भाजपकडून निवडणूक लढविण्याच इच्छुक होते. मात्र, अजित पवार यांच्या पक्षाने भाजपसोबत युती केली. परिणामी युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्हे स्पष्ट होती. ज्यामुळे विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांनाच अजित पवार यांच्या पक्षाकडून तिकीट मिळण्याची स्पष्ट शक्यता आहे. अशा वेळी आपले राजकारणच संपण्याची चिन्हे पाटील यांना दिसू लागली. परिणामी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षात प्रवेश करण्याच निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वत: हर्षवर्धन पाटील लवकरच त्याबातब घोषणा करणार असल्याचे समजते.