Harshvardhan Patil Quit BJP: हर्षवर्धन पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी; शरद पवार यांच्या उपस्थितीत NCP (SP) मध्ये प्रवेश
पाटील इंदापूरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
राज्यातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला. इंदापूर (Lndapur Constituency) येथील या राजकीय प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. पाटील यांच्या रुपात पवार यांनी भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. आगामी विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections) च्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोडी मानली जात आहे. पाठिमागील काही दिवसांपासून या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, पाटील यांनी आज, 7 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपमध्ये नाराजी
राज्याचे राजकारण आणि सहकार क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती तसेच, राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांच्या महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे काही काळापासून भाजपमध्ये नाराज होते. खास करुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतरित्या महायुतीमध्ये प्रवेश केल्यापासून ही नाराजी वाढली होती. पाटील हे इंदापूर येथून प्रदीर्घ काळ आमदार राहिले आहेत. मात्र, पाठीमागील सलग दोन वेळा त्यांना राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातच आता भरणे हे अजित पवार गटाकडे गेले आहेत आणि महायुतीच्या जागाटवाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवदीला सुटण्याची शक्यता आहे. परिणामी हर्षवर्धन पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे त्यांच्यावरील कार्यकर्त्यांचा दबावही वाढत होता. (हेही वाचा, शरद पवार यांचा डाव; भाजपला जोरदार धक्का; दणक्यात Ajit Pawar यांचे टेन्शन वाढलं; आमदार दत्ता भरणे यांच्यापुढे मोठे आव्हान)
दत्तामामा भरणे यांच्या विरोधात उमेदवारी
दरम्यान, पाटील यांनी यापूर्वी चार वेळा प्रतिनिधित्व केलेल्या इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांच्याविरुद्ध ते शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात, अशा चर्चांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (सपा) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील आज इंदापूर येथे एका सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (सपा) औपचारिकपणे सामील होतील, असे त्यांच्या समर्थकांनी यापूर्वी जाहीर केले होते. (हेही वाचा, Harshvardhan Patil On BJP: भाजपमध्ये शांत झोप लागते.. कोणतीही चौकशी नाही, काही नाही.. त्यामुळे मी आनंदी- हर्षवर्धन पाटील (Video))
भाजप उमेदवाराबाबत अनिश्चितता
सध्या ही जागा सत्ताधारी युतीतील भागीदार असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडे असल्याने, पक्ष त्यांना इंदापूर मतदारसंघात उतरवेल की नाही याबाबत अनेक महिने अनिश्चितता राहिल्यानंतर पाटील यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांच्या जवळच्या सूत्रांनी खुलासा केला की, त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपच्या अनिर्णयामुळे ते नाराज होते, ज्यामुळे शेवटी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (SP) गेले. हर्षवर्धन पाटील यांनी राजकीय पक्ष बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. सन 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात प्रवेश केला होता, परंतु अलीकडच्या राजकीय घडामोडींवरील असंतोषामुळे ते शरद पवारांच्या गटाशी पुन्हा जोडले गेले.
कुटुंबाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश (SP)
हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि पुणे जिल्हा परिषदेची माजी सदस्या अंकित पाटील देखील शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (SP) मध्ये प्रवेश केला.