Harshavardhan Jadhav Health Update: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्लीत नितीन गडकरींच्या घरी असताना हृदयविकाराचा सौम्य झटका

छातीत दुखू लागल्याने, घाम आल्याने त्यांना गडकरींच्या सुरक्षा रक्षकांनी नजिकच्या रूग्णालयात दाखल केले.

Harshavardhan Jadhav | FB

माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांना हद्यविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हर्षवर्धन जाधव हे दिल्लीत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या निवासस्थानी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागल्याने, घाम आल्याने त्यांना गडकरींच्या सुरक्षा रक्षकांनी नजिकच्या रूग्णालयात दाखल केले. आरएमएल रुग्णालयात दाखल असलेल्या हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना सौम्य हार्ट अटॅक आल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी देखील त्यांच्या प्रकृतीचे काही अपडेट्स स्टेटस शेअर करत दिले आहेत. काही महिन्यांपूर्वीच हैदराबाद मध्ये जाऊन जाधव यांनी चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएस मध्ये पक्ष प्रवेश केला आहे.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद मधील कन्नडचे माजी आमदार आहेत. मनसेच्या एका दमात निवडून आलेल्या 13 आमदारांमध्ये हर्षवर्धन जाधव यांचा समावेश होता. मात्र कालांतराने त्यांनी मनसेला रामराम करत शिवसेनेची कास धरली. पण शिवसेनेतही ते रमले नाहीत. आताते बीआरएस मध्ये दाखल झाले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. Heart Attack Kills College Student in Tamil Nadu: मदुराईमध्ये मॅरेथॉन धावताना 20 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू .

मीडीया रिपोर्ट्सनुसार, हर्षवर्धन जाधव यांनी जारी केलेल्या व्हिडीओ मध्ये त्यांच्यावर एन्जीओप्लास्टी झाली असल्याचं म्हटलं आहे. काही कामासाठी आज दिल्लीमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी हर्षवर्धन जाधव पोहचले होते. तेव्हा त्यांना  हृदयविकाराचा झटका आला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif