रेल्वे पोलिसांच्या मदतीमुळे महिलेला परत मिळाली 26 वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये चोरीला गेलेली सोन्याची चेन; आनंदाला राहिला नाही पारावार
शहरातील सर्वात गजबजलेल्या स्थानकापैकी एक. या ठिकाणी तुमची एखादी गोष्ट चोरीला गेली तर ती परत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र आता एका महिलेला याच ठिकाणी 26 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली तिची सोन्याची साखळी (Gold Chain) परत मिळाली आहे.
मुंबईमधील चर्चगेट रेल्वे स्टेशन (Churchgate Station).... शहरातील सर्वात गजबजलेल्या स्थानकापैकी एक. या ठिकाणी तुमची एखादी गोष्ट चोरीला गेली तर ती परत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र आता एका महिलेला याच ठिकाणी 26 वर्षांपूर्वी चोरीला गेलेली तिची सोन्याची साखळी (Gold Chain) परत मिळाली आहे. आजपासून 26 वर्षांपूर्वी, रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेलेली सोन्याची साखळी रेल्वे पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी ती तिच्या मालकिणीला, पिंकी डिकुना यांना परत मिळाली आहे. या चेनची चोरी झाल्यावर पोलिसांनी चोराला ताब्यात घेतले होते, परंतु चोराला पकडण्यापूर्वी या चेनच्या मालकिणीने आपले घर बदलले होते, म्हणून ही चेन परत करण्यास उशीर झाला.
त्यावेळी पोलिसांकडे पिंकू यांचा फोन नंबरही नव्हता. परंतु रेल्वे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू ठेवला आणि शनिवारी त्यांना पिंकू यांची माहिती मिळाली. पोलिसांनी घेतलेली ही मेहनत पाहून पिंकू खूपच प्रभावित झाल्या व त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले. मुंबई सेन्ट्रल रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले की, पिंकु यांनी 8 फेब्रुवारी 1994 रोजी सायंकाळी 7.30 वाजता चर्चगेट रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडली. दरम्यान, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाची साखळी खेचली आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी पिंकू यांनी रेल्वे पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर 15 एप्रिल रोजी पोलिसांनी महमद निजाम नसीर नावाच्या चोराला पकडले व त्याच्याकडून ही साखळी घेतली. (हेही वाचा: सातारा जिल्ह्यात चोरांनी PPE kit घालून सराफाच्या दुकानावर मारला डल्ला; तब्बल 780 ग्रॅम सोने लंपास)
या गोष्टीची माहिती देण्यासाठी जेव्हा पोलीस पिंकू यांच्या घरी गेले तेव्हा समजले की त्या आता तिथे राहत नाहीत. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी पुन्हा त्या महिलेचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला आणि पिंकी यांच्या जुन्या घराशेजारी राहणाऱ्या सर्व लोकांची चौकशी सुरू केली. त्यानंतर पिंकू यांच्या काही नातेवाईकांबद्दल माहिती मिळाली, ज्यावरून पोलिसांना कळले की पिंकू आता वसई भागात राहत आहेत. त्यानंतर रेल्वे पोलिस अधिकारी मिलिंद पाटील यांनी 26 वर्षानंतर शनिवारी पिंकू यांना ही चोरीला गेलेली साखळी परत केली.