Happy Birthday Ramdas Athawale: एक कवी, चित्रकार, माजी दलित पँथर अशी ओळख असणाऱ्या रामदास आठवले यांचा राजकीय प्रवास नक्की वाचा
रामदास आठवले हे फक्त एका पक्षाचे नेतेच नाहीत तर ते केंद्रीय मंत्री देखील आहेत. इतकंच काय तर त्यांचा फॅशन सेन्स देखील नेहमीच चर्चेचा विषय असतो. अशा या बहुरंगी नेत्यांविषयी जाणून घेऊया काही खास गोष्टी.
Ramdas Athawale Birthday Special: एक शीघ्रकवी, चित्रकार आणि माजी दलित पँथर अशी ज्यांची ओळख आहे असे रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणजे रामदास आठवले. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1959 मध्ये झाला होता. आज त्यांचा साठावा वाढदिवस आहे. रामदास आठवले हे फक्त एका पक्षाचे नेतेच नाहीत तर ते केंद्रीय मंत्री देखील आहेत. इतकंच काय तर त्यांचा फॅशन सेन्स देखील नेहमीच चर्चेचा विषय असतो. अशा या बहुरंगी नेत्यांविषयी जाणून घेऊया काही खास गोष्टी.
लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे ते एकटे पडले. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील ढालेवाडी गावात झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांच्या काकांकडे राहायला गेले त्यामुळे त्यांनी पुढील शिक्षण तिथूनच घेतले. नंतर वडाळ्याच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेल्यावर त्यांची खऱ्या अर्थाने तेथे जडणघडण झाली.
1972 साली त्यांनी दलित पॅंथर्स या संघटनेला सुरुवात केली. तसेच रामदास आठवले यांच्यासोबत नामदेव ढसाळ यांचा देखील मोलाचा वाटा आहे. आणि पॅंथर्समुळे त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाल्यामुळे त्यांच्यामागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. अगदी विद्यार्थी असल्यापासूनच त्यांनी अन्याय, अत्याचाराविरोधात लढा दिला. त्या काळी वडाळ्यातील सिदार्थ विहारमध्ये चर्चासत्र चालत, दलित चळवळीतील आणि अनेक पुरोगामी मान्यवर येथे येत असत आणि म्हणूनच रामदास आठवले नेहमी तिथे जात असत.
जेथे जेथे दलित समाजावर अन्याय अत्याचार होत असे तिथे पॅंथरचे कार्यकर्ते पोहचत. थोडक्यात त्या काळात दलित पॅंथर्सचा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रात होता. दलित पँथर्सनिमित्त ते महाराष्ट्रभर दौरे करत असत. पण पुढे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी केली जाऊ लागली. त्या चळवळीत देखील त्यांनी सहभाग घेतला.
नंतर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे मुख्यमंत्री बनले. तेव्हा पवारांनी रामदास आठवले यांना राजकरणात सक्रीय केले आणि 1990 मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात त्यांना समाविष्ट करून घेतले. त्यानंतर त्यांचा राजकारणातील प्रवास सुरु झाला व पंढरपूर लोकसभा मतदार संघातून ते खासदार म्हणून निवडून आले.
परंतु 2009 साली शिर्डी लोकसभा मतदार संघातून त्यांचा पराभूत झाला आणि म्हणूनच 2011 मध्ये त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला रामराम ठोकला.