मदरशा मधून पळून मजा करण्यासाठी 'या' लहानग्यांनी गाठली मुंबई.. पण इथे येताच घडलं भलतंच काही, वाचा सविस्तर
मुंबईच्या पावसात मजा मस्ती करण्याचा प्लॅन आखून गुजरात मधील मदरशा मधून पळून तीन लहानग्यांनी मुंबईची वाट दाहरली होती मात्र इथे येताच कोसळणाऱ्या पावसात अडकून पडल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली, अखेरीस सोमवारी ही 14 वर्षीय मुले ट्रेनने अहमदाबादला परतली आहेत.
पावसाची चाहूल लागताच अनेकांच्या मनातला भटक्या जागा होतो , पावसात मजा करण्यासाठी, थ्रील अनुभवण्यासाठी रोजच्या रुटीनपेक्षा कुठेतरी भलतीकडेच निघून जावं असं एकदा का होईना पण प्रत्येकाला वाटत. असाच भाव मनात धरून गुजरातच्या जमालपूरमधील मदरशामध्ये शिकणारी तीन मुले मुंबईत पळून आली होती. पण मुंबईत पोहचताच धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे या लहानग्यांचे स्वप्न सुद्धा वाहून गेले. मोहम्मद नाबील (Mohammad Nabil), अमीर शेख (Amir Shaikh) आणि अबु सुफीयान (Abu Sufiyan) अशी या मुलांची नावे आहेत. गुजरात (Gujrat) मधील दानीलिम्डा (Danilimda) या ठिकाणचे ते रहिवाशी आहेत. गोरखपूर: TikTok व्हिडिओ बनवण्यासाठी दोन तरुणांची पूलावरुन उडी, एकजण बेपत्ता
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही तीन ही मुले 14 वर्षांची आहेत, पाऊस पडायला लागता त्यांनी हा मजामस्तीचा प्लॅन आखला होता, पण मदरशाच्या कडक शिस्तीमधून त्यांना बाहेर पडण्यास परवानगी मिळणार नाही याचा त्यांना अंदाज होता म्हणून मग कोणालाही काहीच न सांगता हे तिघे रेल्वेने मुंबईकडे याला रवाना झाले. पण मुंबई पोहचताच पावसाने त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवले. सातच्या पावसामुळे मागील काही दिवसात मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते, अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईची उपनगरीय वाहतूक सुद्धा कोलमडली होती.अशातच या तिन्ही मुलांना रेल्वे स्थंकात अडकून राहावे लागले, पाऊस ओसरल्यावर अखेर सोमवारी ही मुले परतीच्या ट्रेनने अहमदाबादला परतली.
हे ही वाचा -अन् गाय मुलांसोबत फुटबॉल खेळू लागली! (Viral Video)
दरम्यान नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या तिघांचे अॅडमिशन रद्द करणार असल्याचे मदरशाकडून सांगण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)