Gudi Padwa 2020: महाराष्ट्राचे उपामुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईत गुढी पाडवा सणाचं साधं सेलिब्रेशन! (Watch Video)
परिणामी घरातच राहून साधेपणाने गुढी पाडवा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मुंबईमध्ये त्यांच्या राहत्या घरी मुलगा पार्थ पवार याच्यासोबत गुढी पाडव्याचा सण साजरा केला.
गुढी पाडवा या सणाने मराठी नववर्षाची सुरूवात होते. मात्र यंदा जगासह देशावर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने पंतप्रधान नरेंद्र यांनी भारतीयांना घराबाहेर न पडण्याचं कळकळीचं आवाहन केलं आहे. त्यामुळे आज (25 मार्च) गुढीपाडव्यानिमित्त सारे सार्वजनिक कार्यक्रम, शोभायात्रा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी घरातच राहून साधेपणाने गुढी पाडवा साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मुंबईमध्ये त्यांच्या राहत्या घरी मुलगा पार्थ पवार याच्यासोबत गुढी पाडव्याचा सण साजरा केला. एरवी पवार कुटुंबीय बारामतीमध्ये त्यांच्या घरी एकत्र येऊन सारे सण जल्लोषात साजरे करतात मात्र सध्या देशासमोर येऊन ठाकलेलं कोरोनाचं जागतिक आरोग्य संकट पाहता सार्यांना जिथे आहात तिथेच रहा असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका व्हिडिओच्या माध्यामातून जनतेलाही घरी बसण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही घरात बसून पुस्तक वाचतोय, कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहोत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित राहावे असे त्या म्हणाल्या आहेत. Happy Gudi Padwa 2020 Images: गुढीपाडव्या निमित्त मराठमोठी खास HD Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून साजरे करा मराठी नववर्ष!
अजित पवार यांचा गुढी पाडव्याचा सण
दरम्यान देशभरात अनेक दिग्गज, राजकारणी, सामान्य नागरिकांनी लोकांना यंदा चैत्र पाडवा घरीच बसून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील "कोरोना- मुक्तीची गुढी उभारूया... नवीन वर्ष २१ दिवस घरी थांबून साजरे करूया... तुम्हां सर्वांना गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या शुभेच्छा... आपणांस व आपल्या परिवारास हे नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे आणि उत्तम आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... घरी राहू...सुरक्षित राहू..." असं मराठमोळं ट्वीट करत जनतेला घरी बसण्याचं आवाहन केलं आहे. यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन.
सध्या भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 562 वर पोहचला असून 40 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत तर 9 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती देण्यात आली आहे. यापैकी महराष्ट्रात कोरोनाबाधित 100 च्या वर आहेत.