Gram Panchayat Election 2022: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा, कोण मारणार बाजी? गावखेड्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
१८ डिसेंबर म्हणजेच रविवारी राज्यातील एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. तर २० डिसेंबर म्हणजेचं मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
शहरी भागातील रहिवाशांना विकेंडची (Weekend) खास आतुरता असते पण या विकेंडची आतुर्ता सर्वाधिक राज्यातील ग्रामिण भागातील जनतेला असणार आहे. कारण १८ डिसेंबर म्हणजेच रविवारी राज्यातील एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. तर २० डिसेंबर म्हणजेचं मंगळवारी या निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे ग्रामपंचायत निवडणुक (Gram Panchayat Election 2022) ही अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपली असुन ग्रामिण भागात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. तरी ग्रामिण भागात होणारी ही ग्रामपंचायत निवडमुकी लोकसभा (Loksabha Election) किंवा विधानसभा निवडणुकीपेक्षाही (Vidhan Sabha Election) अधिक रोमांचक असते. कारण यांत कुठला राजकीय पक्ष नाही तर प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली असते. स्वतच्या गावात आपल्याला किती मान, कोण वरचठं हा बाबत ही निवडणुक असल्याने गावखेड्यात या निवडणुकीचा मोठा उत्साह बघायला मिळतो.
कुठल्याही मोठ्या पक्षाकडून उमेदवार देण्यापेक्षा स्वत वयक्तीकरित्या ग्रामपंचायत निवडणुक लढवण्यावर खेडेभागातील उमेदवारांचा अधिक कल असतो. तसेच यावर्षी गावखेड्यात केवळ मुरले सुरले राजकारणी नाही तर अनेक तरुण तरुणी या निवडणुकीत उत्सफूर्त प्रतिसाद नोंदवताना दिसत आहे. विविध जिल्ह्यात तरुण उमेदवारांनी देखील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपला अर्ज नोंदवला आहे. (हे ही वाचा:- Kolhapur Gram Panchayat Elections 2022 : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी 28 नोव्हेंबर पासून सुरू; 475 गावांना थेट जनतेतून मिळणार सरपंच)
राज्यात अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी,पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यातील एकूण ७७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 16, 2022 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

