Maharashtra Gram Panchayat Election 2021: तब्बल 2 कोटी रुपयांच्या बदल्यात उमराणे ग्रामपंचायत बिनविरोध; बोली लावून थांबवली निवडणूक
या लिलावासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सभा बोलावली. गावच्या रामेश्वर मंदिर परिसरात ही सभा पार पडली. या वेळी सरपंच पदासाठी थेट लिलाव घेण्यात आला.
Maharashtra Gram Panchayat Election 2021: ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चक्क काही लाखांची नव्हे तर चक्क कोट्यवधी रुपयांमध्ये बोली लागली. राज्यात जाहीरपणे पुढे आलेला हा कदाचित पहिलाच प्रकार असावा. पण, असे घडले आहे. नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील देवळा (Deola Taluka) तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत (Umrane Gram Panchayat) चक्क बोली लावून बिनविरोध करण्यात आली. यासाठी चक्क गावच्या चावडीत एखाद्या उत्पादन, वस्तू प्रमाणे लिलाव घेण्यात आला. इच्छुकांनी बोली लावली आणि सरपंच पदासहित ग्रामपंचायत बिनविरोध झाली. काय आहे प्रकार घ्या जाणून.
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात स्थानिक पातळीवर कारणाशिवाय तंटे-बखेडे निर्माण होता. त्यामुळे या निवडणुका बिनविरोध घ्याव्यात असे अवाहन करण्यात येते. मात्र, आता या अवाहनाला आर्थिक चष्म्यातून आणि गावासाठी निधी या दृष्टीकोणातून पाहिले जाऊ लागले आहे. कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी निवडणुका बिनविरोध घ्या असे गोंड अवाहन केले जात आहे. मात्र, या अवाहनाच्या माध्यमातून आता धनदांडगे मागच्या दाराने कायदेशीर प्रवेश मिळवू पाहात आहेत. (हेही वाचा, https://marathi.latestly.com/maharashtra/maharashtra-gram-panchayat-election-2021-dates-polling-on-january-15-counting-of-votes-on-january-18-202844.html)
त्याचे घडले असे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात उमराणे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी गावाने चक्क लिलाव लावला. या लिलावासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सभा बोलावली. गावच्या रामेश्वर मंदिर परिसरात ही सभा पार पडली. या वेळी सरपंच पदासाठी थेट लिलाव घेण्यात आला. या लिलावात दोन पॅनल सहभागी झाले. एका बाजूला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वास तात्या देवरे यांचे सुपुत्र आणि माजी सरपंच प्रशांत उर्फ चंदू देवरे दुसऱ्या बाजूला दुसरे पॅनल.
माजी सरपंच प्रशांत उर्फ चंदू देवरे यांच्या पॅनलने सरपंच पदासाठी चक्क 2 कोटी 5 लाखांची बोली लावली. ही बोली अंतिम ठरली. त्यानंतर प्रशांत उर्फ चंदू देवरे यांना सरपंच म्हणून एकमुखी मान्यता देण्यात आली. या बोलीसाठी काही लाख रुपयांपासून सुरुवात झाली होती. मात्र बोली जिंकलेल्या पॅनलकडे गावचा कारभार सोपविण्यात आला. गावकऱ्यांनी गावच्या मंदिरासाठी ही बोली लावल्याचे समजते.