Graduate Constituency Election: पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? अरुण लाड, उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे यांच्यात स्पर्धा
तसेच, भाजप उमेदवार या मतदारसंघातून पाचपैकी चार वेळा सलग निवडूण गेला आहे. त्यानंतर त्यांनी कोथरुड मतदारसंघातून विधानसभआ निवडणूक लढवली. ते निवडूण आल्याने त्यांनी या जागेचा राजीनामा दिला. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. त्यामुळे आता भाजप या जागेवरुन कोणाला संधी देते याबाबत उत्सुकता आहे.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील (Graduate Constituency Election 2020) पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार नागपूर (Nagpur), पुणे (Pune) व औरंगाबाद (Aurangabad) विभाग पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता आहे. हा मतदारसंघ गेली अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालते याबबत उत्सुकता आहे. सध्यास्थितीत अरुण लाड (Arun Lad), उमेश पाटील (Umesh Patil), श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) या तिघांमध्ये तीव्र स्पर्धा असल्याचे पाहायला मिळत आहे
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील हे दोन वेळा मोठ्या फरकाने निवडून गेले आहेत. तसेच, भाजप उमेदवार या मतदारसंघातून पाचपैकी चार वेळा सलग निवडूण गेला आहे. त्यानंतर त्यांनी कोथरुड मतदारसंघातून विधानसभआ निवडणूक लढवली. ते निवडूण आल्याने त्यांनी या जागेचा राजीनामा दिला. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. त्यामुळे आता भाजप या जागेवरुन कोणाला संधी देते याबाबत उत्सुकता आहे.
शरद पवार यांचा शब्द निर्णायक
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शरद पवार यांच्या पसंतीनेच रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे. या उमेदवारीसाठी शरद पवार यांचे मत महत्त्वाचे ठरु शकते. अशा वेळी शरद पवार हे ज्याच्या पारड्यात आपले अनुकूल मत टाकतील त्यालाच उमेदवारी मिळेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे अरुण लाड, उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे, अजिंक्यराणा पाटील यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळते की धक्कातंत्राचा वापर करत राष्ट्रवादी आणखी कोणता नवा चेहरा रिंगणात उतरवते याबबत उत्सुकता आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ रचना
पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांत मिळून एकूण 58 तालूके आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा विस्तीर्ण अवाका ध्यानात घेता उमेदवार निवड महत्त्वाची ठरते. अशा वेळी उमेदवाराने मतदारसंघात नोंदणी करण्यासाठी घेतलेले कष्ट, वय, सामाजिक प्रतिमा, लोकसंपर्क आणि नेतृत्वासोबतचे संबंध अधिक महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी चुरस पाहायला मिळते. (हेही वाचा, MLC Elections: विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर; भाजपपुढे 'या' जागा राखण्याचे मोठे आव्हान)
चुका टाळण्यासाठी राष्ट्रवादी लागली कामाला
दरम्यान, मागच्या वेळी पुणे पदवीधर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील निवडूण आले खरे. परंतू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली बंडखोरी त्याला कारणीभूत ठरली. बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मतविभाजनी झाली. परिणामी चंद्रकांत दादा पाटील यांचा विजय सोपा झाला. यावेळी मागच्या वेळी झालेल्या चुका करायच्या नाहीत, असे ठरवून राष्ट्रवादी कामाला लागल्याचे समजते.
निवडणूक कार्यक्रम
पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबरला जाहीर होईल. 12 नोव्हेंबरला नामांकन दाखल करण्यासाठी अखेरचा दिवस असेल. 13 तारखेला दाखल अर्जांची छाननी होईल. 17 तारखेपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. तर 1 डिसेंबर या दिवशी मतदान होऊन 3 डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. निवडून आलेल्या उमेदवारांचा शपथवीधी 7 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात होईल.