अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई मच्छीमार, शेतकरी यांना मिळण्यासाठी राज्यपाल मदत करणार - आदित्य ठाकरे यांची माहिती
राज्यपालांनी देखील महाराष्ट्राच्या नुकसानीचा आढावा घेत मदत करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या 63 आमदारांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल यांची राजभवनात भेट घेतली. यावेळेस महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेऊन शेतकरी आणि कोळी बांधवांना त्वरित मदत करण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा यासाठी मागणी केल्याची माहिती शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात सध्या सरकार नसल्याने राज्यपालांनी पुढाकार घेऊन केंद्राशी बोलावे, संबंधित टीमला नुकसानीच्या पहाणीसाठी बोलवावे यासाठी शिवसेनेने राज्यपालांना पत्र दिले आहे. यावर राज्यपालांनी देखील महाराष्ट्राच्या नुकसानीचा आढावा घेत मदत करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. Maharashtra Weather Forecast: कोकण, गोवा सह महाराष्ट्रात पुढील 48 तास पावसाचे; हवामान खात्याचा अंदाज.
आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदारांसोबत राज्यपालांची भेट घेतली. तसेच उद्यापासून उद्धव ठाकरेंसोबत शिवसैनिक कोकणाच्या दौर्यावर जाणार असल्याची माहिती देखील दिली आहे. मात्र सत्ता स्थापनेबद्दल आदित्य ठाकरे यांनी बोलणं टाळलं आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असेही ते म्हणाले.
ANI Tweet
महाराष्ट्रात मान्सून सोबतच परतीचा पाऊस याने कोकण किनारपट्टी तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये धुमाकूळ घातला आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेले पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. क्यार वादळाच्या तडाख्यात कोकणात भात शेती आणि कोळी बांधवांचं देखील नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई शेतकर्यांना, कोळी बांधवांना मिळावी यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.