Maharashtra Government Formation: राज्यपाल राष्ट्रवादी काँग्रेस ला देणार सत्ता स्थापनेची संधी की महाराष्ट्रात लागणार राष्ट्रपती राजवट?
शिवसेनेला आज संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत सत्ता स्थापन करण्याची संधी होती.
शिवसेना पक्षाकडून आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अनेक बडे नेते हे राज्यपालांच्या भेटीला आज राजभवनात गेले होते. शिवसेनेला आज संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत सत्ता स्थापन करण्याची संधी होती. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याची पत्रे शिवसेनेकडे वेळेत पोहोचली नसल्याने शिवसेनेला सत्ता स्थापन अजूनही करता आलेली नाही.
आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की शिवसेनेने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला परंतु त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळण्यासाठी अजून २ दिवसांची मुदत हवी होती जी राज्यपालांकडून वाढवून देण्यात आलेली नाही.
राष्ट्रपती राजवट म्हणजे नक्की काय व केव्हा लागू होते? वाचा सविस्तर
आता मात्र पुढे काय याचा निर्णय फक्त राज्यपालांच्या हातात असणार आहे. राज्यपाल आता जागांच्या आकडेवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेची संधी देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. परंतु राज्यपालांकडे असणारा दुसरा पर्याय म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे. त्यामुळे राज्यपाल आता नक्की काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सत्ता स्थापनेची संधी गेल्यास शरद पवार ठरू शकतील खऱ्या मास्टर माईंड.