Maharashtra Corona Vaccination: महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली महत्वाची माहिती
भारतात आलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेचा महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), कर्नाटक (Karnataka), केरळ (Kerala), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), तमिळनाडू (Tamil Nadu), पश्चिम बंगाल (West Bengal), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि बिहारला (Bihar) मोठा फटका बसला आहे.
भारतात आलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेचा महाराष्ट्र (Maharashtra), दिल्ली (Delhi), कर्नाटक (Karnataka), केरळ (Kerala), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), तमिळनाडू (Tamil Nadu), पश्चिम बंगाल (West Bengal), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि बिहारला (Bihar) मोठा फटका बसला आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरणाची गती वाढवली असल्याची माहिती राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Kosari) यांनी दिली आहे. तसेच कोरोनावर ठेवण्याच्या प्रयत्नांसह विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्य सरकार कार्यरत आहे, असेही ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, विकासाची गती कायम ठेवण्याव्यतिरिक्त समाजातील अत्याचार, महिला आणि शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. सरकार गेल्या दीड वर्षांपासून साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्याचे तसेच विकासाची गती राखण्यासाठी काम करत आहे, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल, तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार?, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
तसेच, आम्ही गेल्या 15 महिन्यांपासून एकत्र कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र, मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. याचपार्श्वभूमीर राज्य सरकारने लसीकरणाची गती वाढवली आहे, असे कोश्यारी म्हणाले आहेत. याशिवाय, राज्य सरकारच्या नियमांचे पालन करून सर्व नागरिकांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.