मराठा आरक्षण विधेयक सरकार 28 नोव्हेंबरला विधानसभेत मांडणार
या बैठकीत विधेयकाच्या स्वरुपावर चर्चा करण्यात आली.
येत्या बुधवारी म्हणजे 28 नोव्हेंबरला राज्य सरकार विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक सादर करणार आहे. तर 29 नोव्हेंबरला मराठा आरक्षण विधेयक विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे. मराठा आरक्षण उपसिमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा संवाद यात्रेपूर्वी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
आज (26 नोव्हेंबर) मराठा आरक्षण उपसमितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत विधेयकाच्या स्वरुपावर चर्चा करण्यात आली. आज सायंकाळी पुन्हा एकदा उपसमितीची बैठक होणार आहे.
ओबीसी किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले होते. ओबीसी आरक्षणाला कोठेही धक्का न लावता मराठा समाजासाठी विशेष प्रवर्ग तयार करण्यात आला आहे. सामाजिक आर्थिक मागास वर्ग (Socialy economiclay backward class) असा हा प्रवर्ग आहे.
गेल्या 3 वर्षांपासून आंदोलन, मोर्चे, उपोषण या स्वरुपात सुरु असलेला मराठा समाजाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे.