Government Officer Transfer: राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, तहसीलदार रडारवर; घ्या जाणून

वरवर पहाता या बदल्या एक नियमीत प्रक्रिया असल्याचे सांगितले जात असले तरी, आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) च्या पार्श्वभूमीवर या बदल्यांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

Government Office | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यातील महसूल विभागातील (Revenue Department) अधिकाऱ्यांच्या बदल्या (Government Officer Transfer) राज्य सरकारने केल्या आहेत. वरवर पहाता या बदल्या एक नियमीत प्रक्रिया असल्याचे सांगितले जात असले तरी, आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election) च्या पार्श्वभूमीवर या बदल्यांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. खास करुन या बदल्यांमध्ये तालुका पातळीवर कार्यरत असलेल्या तहसीलद पदाचा विशेष समावेश आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील (Marathwada) सर्वच आठ जिल्ह्यातील जवळपास 27 तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत.

कोणत्या तहसिलदारांची कोणत्या तालुक्यात बदली

(हेही वाचा, Maharashtra: आता ऑनलाईन होणार कर्मचाऱ्यांच्या बदल्या; CM Eknath Shinde यांचा ऐतिहासिक निर्णय)

दरम्यान, महसूल विभागातील केवळ तहसीलदार पदावरील बदल्याच नव्हे तर पोलीस दलात देखील मोठ्या प्रमाणावर बदली आदेश निघाल्याचे समजते. या बदल्यांकडेही आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकांकडे महत्त्वाच्या दृष्टीकोणातून पाहिले जात आहे. कास करुन राज्यातील पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस आयुक्त, सहआयुक्त, पोलीस अधीक्षक दर्जाच्या 64 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आदेश निघाल्याचे समजते. राज्यातील इतरही महत्त्वाच्या प्रशासकीय पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांचा तपशील समजू शकाल नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif