Mission Kavach Kundal Yojana: महाराष्ट्रात 'मिशन कवच कुंडल योजने'ला आजपासून सुरुवात, दिवसाला 15 लाख नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य
या योजनेंतर्गत दिवसाला 15 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी दिली.
कोरोना महामारीच्या (Coronavirus) संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यात आजपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल योजना (Mission Kavach Kundal Yojana) राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत दिवसाला 15 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गुरुवारी दिली. सर्वांना किमान पहिली मात्रा दिली गेल्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल असाही त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
राजेश टोपे म्हणाले की, राज्य सरकारकडून राज्यात 8 तारखेपासून मिशन कवच कुंडल योजना राबवली जाणार आहे. ही योजना 14 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 6 दिवस चालवली जाणार आहे. या योजनेंतर्गरात राज्यात दिवसाला 15 लाखांहून अधिक नागरिकांना लस दिली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांसह आणि संबंधित भागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना लवकरात लवकर लशींच्या दोन्ही मात्रा देण्याकडे राज्य सरकार लक्ष्य देत आहे, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Income Tax Department च्या रडार वर अजित पवार यांचे निकटवर्तीय; जरंडेश्वर सह काही साखर कारखान्यांवर छापे
राजेश टोपे यांचे ट्वीट-
केंद्र सरकारने दसऱ्यापर्यंत (15 ऑक्टोबर) 100 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर, राज्यात प्रतिदिन 15 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच लक्ष्य आहे. राज्य सरकारकडे सध्या 75 लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. तर, आणखी 25 लाख लसी गुरुवारी मिळणार असून लसींचा तुटवडा नसल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.