अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर सत्तावाटपाची चर्चा? किती महामंडळं, मंत्रिपद मिळणार?
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, अजित पवार यांच्यापाठीमागे तब्बल 27 आमदार असल्याचा दावा भाजपने केले आहे. मात्र, हे आमदार नेमके कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मिळाले नाही.
Government Formation in Maharashtra: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर आपले बंधू श्रीनिवास पवार यांच्या चर्चगेट येथील निवासस्थानी असलेले अजित पवार (Ajit Pawar) हे अखेर बाहेर पडले आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा (Varsha) येथे दाखल झाले आहेत. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपचे जेष्ठ नेते उपस्थित असल्याचे समजते. दरम्यान, या बैठकीत अजित पवार गट राष्ट्रवादीतून बाहेर पडत जर भाजपसोबत आला आणि सरकार स्थापन केले तर या गटास किती मंत्रीपदं मिळणार याबाबत चर्चा सुरु असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
अजित पवार गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला तर, या गटास जवळपास 12 मंत्रिपदं आणि 16 महामंडळं दिली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे की, अजित पवार यांच्यापाठीमागे तब्बल 27 आमदार असल्याचा दावा भाजपने केले आहे. मात्र, हे आमदार नेमके कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप मिळाले नाही.
दिवसभरातील घडामोडी पाहता अजित पवार यांच्यासोबत शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदारांपैकी जवळपास 8 ते 9 आमदार एक एक करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत आता नेमके किती आमदार आहेत हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे. (हेही वाचा, अजित पवार घरातून बाहेर निघाले पण गेले कोठे? गुप्त बैठकीसाठी रवाना झाल्याचे वृत्त)
दरम्यान, अजित पवार हे वर्षा बंगल्यावर पोहचण्यास आणखीही एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. हे कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या नोटीशीला कसे उत्तर द्यायचे आणि कायदेशीर लढाईला कसे सामोरे जायचे यावर विचार विनीमय करण्यासाठी जेष्ठ वकिलांचा सल्ला घेणे करजेचे आहे. त्यामुळेही हे दोन्ही नेते एकत्र आल्याचे समजते.