गोरेगाव जवळ सिग्नल मध्ये बिघाड, पश्चिम रेल्वेची सेवा 15-20 मिनिट उशिराने
जोगेश्वरी-गोरेगाव स्थानकांच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक साधारण 15 ते 20 मिनिटे उशिराने होत आहे.
जोगेश्वरी-गोरेगाव स्थानकांच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सकाळी 7.05 च्या सुमारास या सिंग्नल मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता पाम पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी 7.50 पर्यंत हा बिघाड दुरुस्त केल्याने आता ट्रेन सुरु झाल्या आहेत. मात्र यामुळे पुढील काही वेळ लोकल धीम्या गतीने आणि साधारण 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
ANI ट्विट
ANI, च्या माहितीनुसार तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून केवळ काही वेळासाठीच रेल्वेची दिरंगाई सहन करावी लागणार आहे.