Gopichand Padalkar on MPSC Exam: 'एमपीएससी' ची परीक्षा 14 मार्चला घ्यावी अन्यथा रस्त्यावरच झोपून राहणार- गोपीचंद पडळकर

अशातच आता येत्या 14 मार्चला असणारी परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणखीच संताप दिसून आला. याचे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पुणे येथे दिसले आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी तेथे आंदोलन करण्यास सुरुवात केली.

Gopichand Padalkar | (Photo Credits: Facebook)

Gopichand Padalkar on MPSC Exam:  एमपीएससीच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशातच आता येत्या 14 मार्चला असणारी परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणखीच संताप दिसून आला. याचे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पुणे येथे दिसले आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी  तेथे आंदोलन करण्यास सुरुवात केली. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 8.30 वाजता जनतेशी संवाद साधताना एमपीएससी च्या परीक्षेची तारीख उद्यापर्यंत अधिकृतरित्या जाहीर केल्याचे स्पष्ट केले आहे. यावर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून परीक्षा 14 मार्चलाच झाली पाहिजे. अन्यथा विद्यार्थ्यांसह स्वत: रस्त्यावर झोपूनच राहू असा इशारा त्यांनी दिला आहे.

पडळकर यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, येथे विद्यार्थी वडापाव खाऊन दिवस काढत आहेत. त्याचसोबत गेल्या दोन-तीन वर्षांपासून विद्यार्थी तयार करत असल्याने परीक्षा 14 मार्चला झालीच पाहिजे. सरकारकडून एमपीएससीची परीक्षा पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचसोबत सरकारवर विश्वास होताच पण आता मात्र पुन्हा परीक्षेवरुन गोंधळ झाल्याने आम्ही रस्त्यावर उतरल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.ऐवढेच नाही तर पोलिसांना आमच्यावर दादागिरी करायीच असल्यास त्यांनी करावी पण विद्यार्थ्यांकडे पाहून निर्णय घ्यावा. या व्यतिरिक्त मी कोणतेही यामध्ये राजकरण करत नसल्याची भुमिका पडळकर यांनी स्पष्ट केली आहे.(CM Uddhav Thackeray Live Updates: 'एमपीएससी' च्या परीक्षेची तारीख उद्या पर्यंत जाहीर केली जाणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकल्यामागील कारण सुद्धा स्पष्ट केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, परीक्षेसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते परंतु त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांची कोरोनाची सध्या चाचणी करुन घेणे अनिवार्य ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी परीक्षेदरम्यान खेळ खेळला जाणार नाही असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आणखी एक महत्वाचे म्हणजे ही परीक्षा फक्त काही दिवसांसाठी पुढे ढकलली गेली असून पुढील 15 दिवसांच्या आतच ती घेतली सुद्धा जाणार आहे.