कुत्र्याचे मटन, धनगर आरक्षण आंदोलकांसमोर गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान

धनगर समाजाने (Dhangar Community) बकऱ्या पाळणे बंद केले तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचे मटन (Dog Mutton) खावे लागेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

Gopichand Padalkar | (Photo Credit: Facebook)

Dhangar Reservation: एसटी प्रवर्गातून (ST Category) आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज (Dhangar Community) राज्यभर आंदोलन करतो आहे. हळूहळू ही आंदलने तीव्र होत आहेत. कोल्हापूर येथील तावडे हॉटेल परिसरातही आज (13 सप्टेंबर) याच मुद्द्यावरुन रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या वेळी आंदोलनाच्या व्यासपिठावरुन बोलताना आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar Controversial Statement) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. 'धनगर समाजाने बकऱ्या पाळणे बंद केले तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचे मटन खावे लागेल', असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आदोलनाच्या मूळ मागण्यापेक्षा भलत्याच विषयाची चर्चा सुरु झाली आहे.

वादग्रस्त विधाने करणारे नेते हीच ओळख

आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळेच अनेकदा चर्चेत असतात. मग ते राज्यातील आणि केद्रातीलही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी काढलेले उद्गार असोत की, विधानपरिषद सभापतींसोबत झालेला वाद. ते काहीही विधान करत असतात, ज्यामुळे वाद निर्माण होतो. राज्यात COVID-19 विषाणूची साथ असताना त्यांनी 'शरद पवार हे महाराष्ट्राचा कोरोना आहेत' असे उद्गार काढले होते. विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासोबतही त्यांनी सभागृहात घातेला वाद चर्चाचा विषय ठरला होता. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे जेजुरी येथे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार होते. त्यावर टीका करताना "शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. त्यांचे काम म्हणजे अहिल्यादेवी यांच्या कार्याच्या विरोधात आहे'', असे उद्गारही पडळकर यांनी काढले होते. आताही कोल्हापूर येथून बोलताना पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Chappal Attack On Gopichand Padlakr: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील चप्पलफेकीच्या घटनेनंतर छगन भुजबळ यांची तीव्र प्रतिक्रिया (Watch Video))

'आमदारकी समाजामुळेच मिळाली'

कोल्हापूर येथील तावडे हॉटेल परिसरातून धनगर आरक्षण आंदोलकांसमोर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, आमचा धनगर बांधव साधाभोळा आहे. तो नेहमीच कष्ट करत राहतो. मेंढ्या चारण्यासाठी तो पायपीट करतो. मेंढ्यांना चारण्यासाठी तो एकदा का घरातून बाहेर पडला की, तो सहासहा महिने परत घरी परतत नाही. तो बकऱ्या चारतो म्हणून राज्यातील जनतेला मटन मिळतं. त्यांनी त्या चारणे बंद केले तर लोकांना कुत्र्याचे मटन खावे लागेल. आमची मुले सर्वांच्या पाठिमागे फिरतात. आमच्या असाहयतेचा फायदा घेऊन आम्हाला गुरासारखं मारलं जातं. मला मिळालेली आमदारकी, समाजामुळेच मिळाली असल्याचेही ते म्हणाले. (हेही वाचा, Ladki Bayko and MehunYojana: 'लाडकी बायको, लाडकी मेहुणी योजना आणतील', मनोज जरांगे यांची राज्य सरकारवर टीका)

कोल्हापुरात सकाळी 11 वाजता सुरु झालेले आंदोलन दुपारी बारा वाजेपर्यंत सुरु होते. दरम्यान, राज्यातील इतरही विविध जिल्ह्यांमध्ये धनगर समाचाचे आरक्षण आंदोलन सुरु आहे. खास करुन उस्मानाबाद, परळी, बीड, पंढरपूर, लातूर, नेवासा अशा काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले दिसले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif