Mumbai Traffic Update: मुंबई अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

येत्या 7 नोव्हेंबर पासून गोपाळ क्रिष्ण गोखले ब्रिज वाहतुकीसाठी संपूर्ण रित्या बंद असेल अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

मुंबईत (Mumbai) एक भागातून दुसऱ्या भागास जोडण्यासाठी पूल मार्ग अत्यंत उपयोगी ठरतात. पण बरेच सगळे पुलांचं बांधकाम जुनं झालं असल्याने काही पुलांची पुर्नरचना किंवा काही पुलांची डागडूजीचं काम महापालिका करीत आहे. कारण जुने पुलं वाहतुकीसाठी वापरणं धोकादायक. एल्फिस्टन ब्रिज दुर्घटनेनंतर (Elpheston Bridge Accident) धडा घेत महापालिकेकडून (Mumbai Mahapalika) विविध मार्गाचे बांधकाम सुरु आहे. तरी अंधेरी परिसरातील वर्दळीचं ठिकाण म्हणजे गोपाळ कृष्णा गोखले ब्रिज (Gopal Krishna Gokhale Bridge). तरी हा ब्रिज जुना झाला असुन तो आता वाहतुकीसाठी सुरक्षित नाही अशी माहिती मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तरी या पार्श्वभुमिवर हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तरी येत्या 7 नोव्हेंबर पासून हा ब्रिज वाहतुकीसाठी संपूर्ण रित्या बंद असेल अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

 

मुंबई वाहतुक विभागाकडून (Mumbai Traffic Police) गोपाळ कृष्ण गोखले ब्रिज (Gopal Krishna Gokhale Bridge) ऐवजी काही पर्यायी वाहतुक मार्ग सुचवण्यात आले आहेत. तरी अंधेरी भागातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी हे मार्ग प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

-खार सबवे, खार

- मिलन सबवे उड्डाणपूल, सांताक्रूझ

- कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले

-अंधेरी सबवे, अंधेरी, मुंबई

- बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जोगेश्वरी

- मृणालताई गोरे उड्डाणपूल, गोरेगाव (हे ही वाचा:- Fashion Street Fire broke Out: मुंबईत फॅशन स्ट्रीट परिसरात आग, आगीवर नियंत्रण, मात्र कपड्यांची दुकाने जळाली, कोणतीही जीवित हानी नाही, व्हिडिओ व्हायरल)

७ नोव्हेंबर पासून वाहतुकीसाठी बंद होणारा हा ब्रिज पुढे कधी सुरु होणार याबाबत कुठलीही माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली नाही. तरी तुम्ही अंधेरी भागातील रहिवाशी असाल किंवा गोपाळ क्रिष्ण गोखले ब्रिज वरुन सातत्याने प्रवास करत असाल तर याबाबीची खबरदारी घ्यावी अशी सुचना मुंबई वाहतुक विभागाकडून देण्यात आली आहे.