Gondia Teachers Drown: गोंदियातील 3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू
काल रात्री फिरायला गेले त्यावेळी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
गोदिंयातू छत्तीसगढमध्ये फिरायला गेलेल्या तीन शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. छत्तीसगढ राज्यातील सोमणी पोलीस ठाण्यातर्गत येणाऱ्या माणगावात ही घटना घडली आहे. बुडून मृत्यू झालेले तिघेही शिक्षक असून गोंदियात एका कोचिंग क्लासमध्ये ते शिकवत होते. तिन्ही मृतक नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान या घटनेने गोंदियामध्ये शोककला पसरली आहे. (हेही वाचा - Mumbai Jellyfish Attack: जुहू चौपाटीवर जेलीफिशचा सहा जणांना दंश; मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन)
हे तिघेही शिक्षक गोंदियातील सिद्धिविनायक कोचिंग क्लासमध्ये ते शिक्षक होते. काल रात्री फिरायला गेले त्यावेळी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. एन. मिश्रा (भिलाई), अरविंद (उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (नागपूर) यांचा समावेश आहे. हे तिन्ही जण फिरायला गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान धरणाच्या पाण्यात तीन शिक्षक बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि शोध आणि बचावकार्य हे स्थानिकांच्या मदतीने सुरु करण्यात आले. शोधकार्यादरम्यान रात्री एक तर आज सकाळी अन्य 2 मृतदेह सापडले असून तिन्ही मृतहेद शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या तिन्ही शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.