Gold Silver Rate Today: सोने-चांदीमधील तेजी कायम, जाणुन घ्या आजचे दर
चांदीचा भाव 61658 रुपये इतका आहे.
ओमिक्राॅनचा फैलाव आणि पुन्हा लॉकडाउनचे संकट या घडामोडी सोने आणि चांदीमध्ये तेजी वाढवण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. आज बुधवारी सोने 60 रुपयांनी महाग झाले. तर कालच्या सत्रात सोन्याच्या किमतीत 234 रुपयांची वाढ झाली होती. दोन दिवसात सोने 300 रुपयांनी महागले. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47999 रुपये आहे. त्यात 44 रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 62230 रुपये असून त्यात 40 रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी कालच्या सत्रात मंगळवारी सोनं 234 रुपयांनी महागले आणि त्याचा भाव 47950 रुपयांवर स्थिरावला. चांदी 506 रुपयांनी महागली आणि त्याचा भाव 62247 रुपये इतका झाला होता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज बुधवारी सोन्याचा भाव 48126 रुपये आहे. चांदीचा भाव 61658 रुपये इतका आहे.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46890 रुपये इतका खाली आला आहे. 24 कॅरेटचा भाव 48890 रुपये इतका आहे. त्यात 370 रुपयांची घसरण झाली. आज दिल्लीत सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 47050 रुपये इतका आहे. दिल्लीत 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 51330 रुपये आहे. (हे ही वाचा Mumbai: बेस्ट बसच्या 60 कर्मचाऱ्यांसह चालकांना कोरोनाची लागण.)
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.