Gold, Silver Rate Today: दिवाळी सणाच्या सुरूवातीला आज सोन्या-चांदीचा दर काय?
उद्यावर धनतेरसचा सण येऊन ठेपला आहे त्यामुळे या सणाच्या निमित्ताने सोनं खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.
आजपासून महाराष्ट्रात दिवाळीचा सण सुरू होत आहे. वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशी सणांची रेलचेल यामध्ये असते. हा सण रंगांचा, दिव्यांचा असतो सोबतच हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण असल्याने या काळात शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याकडेही अनेकांचा कल असतो. मागील काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या भावामध्ये बरीच चढ-उतार बघायला मिळाली आहे. . सोनं हे केवळ गुंतवणूकीचा पर्याय नाही तर महिलावर्गासाठी आभुषणांसाठी प्रमुख आकर्षण आहे त्यामुळे प्रत्यक्ष सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केलं जातं.
उद्यावर येऊन ठेपलेल्या धनत्रयोदशी पूर्वी आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत? असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर IBJA च्या माहितीनुसार आज (28 ऑक्टोबर) 24 कॅरेट सोन्याची किंमत 7851 रूपये आहे. तर 22 कॅरेट साठी प्रतिग्राम 7662 रूपये मोजावे लागणार आहेत. आजचा चांदीचा दर 96552 प्रतिकिलो आहे.
पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
सोन्यामध्ये खरेदी करताना दागिने खरेदी-विक्रीचे दर हे वेगवेगळे असतात. सराफा दुकानाप्रमाणेही त्यामध्ये बदल होत असतात. दिवाळीच्या दृष्टीने सोन्यात दागिने खरेदी करणार असाल तर सोन्याच्या दरावर घडणावळ आणि टॅक्स ही अतिरिक्त किंमत देखील द्यावी लागते. आजपाण सोनं खरेदी करणं हा गुंतवणूकीचा देखील पर्याय आहे. त्यामुळे त्या दृष्टीने देखील वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.