Gold Silver Rate Today: नागपंचमी सणानिमित्त जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने-चांदी दर
हे दर सातत्याने बदलत असल्याने ग्राहक आणि विक्रेते या सर्वांसाठीच हे दर जाणून घेणे महत्त्वाचे वाटते. आज (2 ऑगस्ट) देशभरातील सर्व सरफाबाजार सुरु झाले तेव्हा सोने आणि चांदीची खरेदी विक्री सुरु झाली. देशभरात सोने आणि चांदी दरात मोठा फरक दिसतो आहे.
सोने, चांदी (Gold, Silver Rate Today) दरांकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष असते. हे दर सातत्याने बदलत असल्याने ग्राहक आणि विक्रेते या सर्वांसाठीच हे दर जाणून घेणे महत्त्वाचे वाटते. आज (2 ऑगस्ट) देशभरातील सर्व सरफाबाजार सुरु झाले तेव्हा सोने आणि चांदीची खरेदी विक्री सुरु झाली. देशभरात सोने आणि चांदी दरात मोठा फरक दिसतो आहे. नागपंचमी (Nag Panchami 202) सणानिमित्त सोने, चांदी दराबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असते. इथे आम्ही वाचकांच्या माहितीठी देशभरातील 22ct (22 कॅरेट) और 24ct (24 कॅरेट) सोने दर देत आहोत. हे सर्व दर प्रति 10 ग्रॅम म्हणजेच प्रति तोळा या प्रमाणे आहेत. हे दर एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोने आणि चांदीचे असतात. यात स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर लागणारे कोणतेच कर अंतर्भूत नसतात. या वृत्तात केवळ मूळ सोने दर दिले आहेत.
आज देशभरात सोने 51437 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने बाजार उघडला अशी माहिती इंडियन बुलियन ज्वैलर्स एसोशिएशनच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या आधीच्या दिवशी 51668 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर बंद झाला. बाजार आज सुरु झाला तेव्हा सोने प्रति 10 ग्रॅम 231 रुपये घसरल्याचे पाहायला मिळाले. इतकी घसरण झाली असली तरीही सोने ऑलटाईम हायच्या जवळपास म्हणजेच 4,763 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त दराने विकले जात आहे. सोन्याने आपला सर्वाधिक उच्चांक हा ऑगस्ट 2020 मध्ये बनवला होता. या वेळी सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले गेले होते. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने चांदी दर
मुंबई
22 कॅरेट सोने- 47090 (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने- 51370 (प्रति 10 ग्रॅम)
चांदी- 58,300 (प्रति 1 किलो)
नागपूर
22 कॅरेट सोने- 47120 (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने- 51400 (प्रति 10 ग्रॅम)
चांदी- 58300 (प्रति 1 किलो)
नाशिक
22 कॅरेट सोने- 47120(प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने- 51400(प्रति 10 ग्रॅम)
चांदी- 58300 (प्रति 1 किलो)
पुणे
22 कॅरेट सोने- 47120(प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट सोने- 51400(प्रति 10 ग्रॅम)
चांदी- 58300 (प्रति 1 किलो)
चांदीबाबत बोलायचे तर बाजार सुरु झाला तेव्हा चांदी आज 57622 रुपये प्रति विकली गेली. चांदी आदल्या दिवशी बाजार बंद झाला तेव्हा 58379 प्रति किलो दरांवर बंद झाली. अशा प्रकारे चांदी आज 757 रुपये प्रति किलो तेजीने विक्री सुरु झाली.