Gold Rate Today: दिवाळी तोंडावर असताना आज सोन्या-चांदीचे दर काय? घ्या जाणून
आज गुरु पुष्य योग साधून आणि पुढील आठवड्यात धनत्रयोदशी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा या महत्त्वाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याकडे अनेकांचा भर असणार आहे.
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीकडे ग्राहकांचा वाढता कल पाहता मागील काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ झालेली पहायला मिळाली आहे. PTIच्या रिपोर्टनुसार, बुधावारी सोन्याच्या दरामध्ये 500 रूपयांनी वाढ होत ते 10 ग्राम सोन्यासाठी 81500 झाले होते. तर चांदीने किलोसाठी लाखाचा टप्पा पार केला आहे. 1 हजाराने वाढ होत चांदी 1.02 लाख झाली आहे. 16 ऑक्टोबर पासून सोन्याचा दर 2850 रूपयांनी वाढला आहे. आणि यामध्ये वाढ कायम आहे. आज 24 ऑक्टोबर दिवशी भारतामध्ये सोन्याचे दर 22 कॅरेट साठी 7341 रूपये प्रति ग्राम आहे. तर 24 कॅरेट साठी 8008 रूपये प्रति ग्राम आहे. हे 24 कॅरेट सोनंच 999 गोल्ड असतं. सोन्याप्रमाणे चांदी देखील वधारली आहे. प्रति किलो चांदीसाठी 96,900 रूपये मोजावे लागणार आहेत.
भारतामध्ये विविध भागात आणि सराफा दुकानात सोन्याचे दर थोडे वर खाली असतात. तसेच सोनं विकत घेण्याचा आणि विकण्याचा दर देखील वेगळा असतो. त्यामुळे या दरात हा फरक असू शकतो. तसेच दागिने बनवण्याच्या दृष्टीने सोनं विकत घेण्याचा विचार करत असाल तर दागिने हे प्रामुख्याने 22,23 कॅरेट मध्ये बनवले जातात. त्यावर घडणावळ आणि अन्य टॅक्स देखील द्यावे लागतात.
दरम्यान आज गुरु पुष्य योग साधून आणि पुढील आठवड्यात धनत्रयोदशी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा या महत्त्वाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याकडे अनेकांचा भर असणार आहे. काही जण या मुहूर्तांना साधून डिजिटल सोनं देखील खरेदी करतात. गुंतवणूकीच्या दृष्टीने तो देखील एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.