Gold- Silver Price Today: मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरातील सोने, चांदी दर घ्या जाणून
Gold- Silver Price Today: सोने दरात आज (17 सप्टेंबर) किरकोळ बदल पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही मौल्यवान धातून म्हणून ओळख असलेल्या या धातूच्या दरात होत असलेली घसरण काहीशी थांबताना पाहायला मिळत आहे. आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,800 रुपयांच्या आसपास आहे.
Gold- Silver Price Today: सोने दरात आज (17 सप्टेंबर) किरकोळ बदल पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही मौल्यवान धातून म्हणून ओळख असलेल्या या धातूच्या दरात होत असलेली घसरण काहीशी थांबताना पाहायला मिळत आहे. आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 45,800 रुपयांच्या आसपास आहे. बाजार बंद झाला तेव्हा या आधीच्या ट्रेडमध्ये हीच किंमत प्रति 10 ग्रॅम 46,200 रुपयांवर होती. दरम्यान, चांदी दरातही बरेच बदल होताना पाहायला मिळत आहेत. बाजार बंद झाला तेव्हा प्रति किलो 56,400 रुपये दराने विकली जात असलेली चांदी आज सरासरी प्रति किलो 56,400 रुपये दराने विक्री होत आहे. गुड रिटर्न्स वेबासाईटने याबाबत तपशीलावर माहिती दिली आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने-चांदी दर.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने चांदी दर
मुंबई
22 कॅरेट- 45,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 49,960 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
पुणे
22 कॅरेट- 45,830 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 49,980 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
नागपूर
22 कॅरेट- 45,830 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 49,980 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
नाशिक
22 कॅरेट- 45,830 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 49,980 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
चांदी- 654रुपये (प्रति 10 ग्रॅम)
(टीप- वरील सर्व दर गुड रिटर्न्स बेवसाईटवर दिलेल्या माहितीनुसार)
वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2022 09:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

