Gold, Silver Price Today: सोने दर उतरले? अरे व्वा! पण किती? आणि चांदीचं काय? घ्या जाणून
सर्व काही ठप्प होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसला होता. अशा वेळी अनेक गुंतवणुकदारांनी आपली गुंतवणूक सोन्यात केली. ही गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकदारांची संख्या मोठी होती.
गेल्या काही महिन्यांपासून अपवाद वगळता सोने (Gold ), चांदी (Silver) या धातूंचे दर गगनाला गवसणी घालत आहेत. त्यामुळे गुंतवणुकदार सोने, चांदी आणखी महाग होण्याची स्वप्ने पाहात आहेत. तर सर्वसामान्य खरेदीदार असलेली गरजू मंडळी सोने, चांदी दर उतरण्याची वाट पाहात आहेत. सोने दर (Gold Price) उतरण्याची वाट पाहणाऱ्या मंडळींसाठी तो क्षण आला आहे. आज (17 फेब्रुवारी 2021) सोने दर उतरला आहे. तर चांदी (Silver Price) काहीशी महाग झाली आहे. प्राप्त माहितीनुसार सोने आज 46, 788 रुपये दराने विक्री होत आहे. परंतू ही घसरण अगदीच कमी म्हणजे 111 रुपये इतकी आहे. या तूलनेत चांदी वधारली असून आगोदरच्या दरात चांदी 135 रुपयांनी महागली आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये आज चांदी 69,507 रुपये प्रती किलो या दराने विकली जात आहे. गेल्या काही काळापासून चांदीच्या दरात सर्वसाधारण घसरण पाहायला मिळत आहे. सोने दरही मोठ्या प्रमाणावर घसरत आहेत. मधल्या काळात एक टप्पा असा आला होता की, सोने दर चक्क सर्वसामान्यांच्या खरेदीच्या आवाक्याबाहेर गेला होता. त्यानंतर सोने दर हळूहळू खाली उतरु लागले. ऑगस्ट महिन्याची आकडेवारीच पाहायचे तर त्या महिन्यात सोने प्रति तोळा 56,200 इतके होते. त्या तुलनेत सोने दर आता प्रति तोळा 9,400 रुपये इतक्या फरकाने स्वस्त झाले आहे. (हेही वाचा, Gold Rate Today: भारतात सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त घसरण, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्ली सह महत्त्वाच्या शहरांतील आजचे दर)
सोने दर उतरण्याचे कारण विचारले असता सोने बाजारातील विश्लेशक सांगतात की, कोरोना काळात लॉकडाऊन सुरु होता. सर्व काही ठप्प होते. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसला होता. अशा वेळी अनेक गुंतवणुकदारांनी आपली गुंतवणूक सोन्यात केली. ही गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकदारांची संख्या मोठी होती.
पुढे बोलताना सोने बाजाराचे अभ्यासक सांगतात की, आता परिस्थिती बदलत आहे. सर्व काही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे गुंतवणुकदार पुन्हा एकदा शेअर बाजाराकडे वळत आहेत. परिणामी सोन्यातील गुंतवणूक कमी होताना दिसत आहे. त्याचा परिणाम सोनेदरात घट होण्यात होत असल्याचे अभ्यासक सांगतात.