Gold Silver Price: नव्या वर्षात सोने-चांदीच्या किमतीस झळाळी, जाणून घ्या नवे दर

नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोने, चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली असुन तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये जावून दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचा निर्णय घ्या.

Gold | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

नव्या वर्षाचे आगमन झाले आहे. नवीन वर्षाचा हा पहिलाचं आठवडा असुन दररोज विविध किंमतींच्या दरात मोठे बदल बघायला मिळत आहेत. तरी नव्या वर्षात काय काय खरेदी करायचं ह्याची तुम्ही योजना आखली असेल. काही लोक नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सोने, चांदी खरेदी करण्याचाही विचार करत असाल तर हो ही बातमी तुमच्यासाठी आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोने, चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली असुन तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये जावून दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी सोने चांदीचे नवे दर जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचा निर्णय घ्या. जेणेकरुन आपल्याला सोने, चांदी खरेदी करणे सोपे जाऊ शकते. सोन्या-चांदीचे भावात (Gold Silver Price) आज लक्षणीय वाढ बघायला मिळत आहे. कालच्या सरासरी सोन्याच्या भावाच्या तुलनेत आजचा सोन्याचा भाव तब्बल 500 रुपयांनी वाढला असुन आजचा सोन्याचा प्रति 10 ग्रामचा दर 55,800 रुपये आहे. तर कालच्या दराच्या एकूण तुलनेत चांदीत 69,140 रुपये प्रति असा चांदीचा दर आहे.

 

राज्याची राजधानी मुंबईत (Mumbai) आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 55,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच अमेरिकन डॉलरच्या (Dollar) तुलनेत जर रुपया आणकीच घसरला तर भारतात सोने महाग होण्याची मोठी शक्याता वर्तवण्यात येत आहे. तरी तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आज सोने खरेदी करणं अधिक फायद्याच ठरणार नाही. (हे ही वाचा:- LPG cylinder Price Hike Today on January 1, 2023: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दणका, एलपीजी दरात वाढ)

 

गेले काही दिवस सोने चांदीचे (Gold Silver Rate) भाव अगदी गगनाला भिडले आहे. तरी तुम्ही सोन्या चांदीची खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हो आता सोन खरेदी करण्यासाठी काही दिवस थांबावं हाचं मोलाचा सल्ला असेल. पण आता नवीनवर्षाच्या निमित्ताने सराफा बाजारात (Sarafa Market) मोठी गर्दी बघायला मिळत आहे.