Gold Rates On Akshaya Tritiya: अक्षय्यतृतीया निमित्त सोने खरेदी करताय? आगोदर दर तर जाणून घ्या
साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय्यतीतीयेदिवशी सोने खरेदीस प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या दिवशी सोने दर (, Gold Price Today) काय आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते.
अक्षय्यतृतीया (Akshaya Tritiya) आणि सोने खरेदी (Gold Buying ) ही एक परंपराच. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय्यतीतीयेदिवशी सोने खरेदीस प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या दिवशी सोने दर (, Gold Price Today) काय आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. त्यामुळे आज इथे आम्ही महाराष्ट्रातील आणि देशातील काही महत्त्वांच्या शहरांतील सोने दर येथे देत आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने दर विचारात घेता प्रति 10 ग्राम 22 कएरेटचे सोने 47,200 रुपयांना विक्री होत आहे. प्रति 10 ग्राम 24 कॅरेट सेने 51,510 रुपये दरावे विकले जात आहे. गुडरिटर्न्स (Goodreturns ) ही वेबसाईट सोने, चांदी दरांबाबत प्रतिदिन अद्ययावत माहिती जाहीर करत असते. इथे दिलेले सर्व दर त्यानुसारच आहेत. इथे दिलेले सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात GST, TCS आणि इतर शुल्क समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधल्यास करांसह सोने दराबाबत आपल्याला स्पष्ट माहिती मिळू शकते. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांती सोने दर
मुंबई
22 कॅरेट- 47,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,510 (प्रति 10 ग्रॅम)
पुणे
22 कॅरेट- 47,280 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,590 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
पुणे
22 कॅरेट- 47,280 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,590 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
नाशिक
22 कॅरेट- 47,280 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,590 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
भारतातील प्रमुख शहरांतील इंधन दर
चेन्नई
22 कॅरेट-48,160 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 52,540 रुपये(प्रति 10 ग्रॅम)
दिल्ली
22 कॅरेट- 47,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,510 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
कोलकाता
22 कॅरेट- 47,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,510 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
बंगळुरु
22 कॅरेट- 47,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,510 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
हैदराबाद
22 कॅरेट- 47,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,510 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
केरळ
22 कॅरेट- 47,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,510 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
अहमदाबाद
22 कॅरेट- 47,260 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 51,570 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता.
दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.