Gold Silver Price: सोने थोडे वधारले, चांदी बऱ्यापैकी घसरली; पाहा काय म्हणतो मुंबई, पुणे सराफा बाजार
तर 24 कॅरेट सोने प्रती 10 ग्रॅम सोने 44,62 दराने विकले जात आहे. अर्थात या दरात काही प्रमाणात बदल असू शकतो. सोन्याच्या तुलनेत चांदी मात्र उतरल्याचे पाहायला मिळाले. सोने प्रती किलो 1800 रुपयांनी उतरल्याचे पाहायला मिळाले.
सोने (Gold ), चांदी (Silver ) दरात काल (मंगळवार, 30 मार्च) काहीशी हालचाल पाहायला मिळाली. सोने काही रुपयांनी वधारले तर चांदी थोडीशी घसरल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी सायंकाळी सराफा बाजार बंद झाला. तेव्हा सोने प्रती 10 ग्रॅम (तोळा) 640 रुपयांनी वधारले तर चांदी प्रती किलो 1800 रुपयांनी घसरल्याचे पाहायला मिळाले. प्राप्त माहितीनुसार, मुंबई (Gold Rate in Mumbai) आणि पुणे सराफा बाजारात 22 कॅरेट सोने प्रती 10 ग्रॅम 43,370 दराने विकले जात होते. तर 24 कॅरेट सोने प्रती 10 ग्रॅम सोने 44,370 दराने विकले जात आहे. अर्थात या दरात काही प्रमाणात बदल असू शकतो.
सोन्याच्या तुलनेत चांदी मात्र उतरल्याचे पाहायला मिळाले. सोने प्रती किलो 1800 रुपयांनी उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी 63,900 रुपये खर्च करावे लागणार आहेत. चांदीचा हा दर कालचा (मंगळवार, 30 मार्च) आहे. चांदीचा हाच दर सोमवारी (29 मार्च) प्रती किलो 65,700 रुपये इतका होता. त्या आधी 28 फेब्रुवारीला हाच दर 67,500 इतका होता. आज हाच दर 65,700 रुपये इतका आहे.
प्रती 10 ग्राम सोने दर 24 मार्चला 1020 रुपयांनी वाढलेला पाहायला मिळाला. त्यानंतर हा दर स्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले. मात्र कालचा दिवस अपवाद ठरला. सोने 640 रुपयांनी वाढले. पाठिमागील महिन्यात 28 फेब्रुवारीला सोने दर 45,930 इतके होते. (हेही वाचा, Gold Rates: गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या किंमतीत 22 टक्क्यांची घसरण; सध्या सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरू शकत का? जाणून घ्या)
सोने दरात स्थानिक ते आंतरराष्ट्रीय अशा अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो. प्रामुख्यने इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोने दर ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन प्रामुख्याने मुंबईतील सोने दर ठरवते. यात स्थानिक आयात कर MCX कमोडिटी मार्केट अशा गोष्टींचा विचार अंतर्भूत असतो.त्यातूनच सोने दर ठरतो.