Gold च्या किंमतीत आठवडाभरात 1200 रुपयांनी वाढ
तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढले असून डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसणरण झाली आहे.
सोन्याचे भाव आठवडाभरात 1200 रुपये प्रती तोळा वाढले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढले असून डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसणरण झाली आहे. तर लग्नसराईची वेळ असल्याने सोन्याचे भाव वाढले आहेत.
8 डिसेंबर रोजी सोन्याचे भाव 32 हजार 100 रुपये प्रती तोळा एवढा होता. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावामध्ये चढ उतार होत आहे. त्याचा परिणाम भारतातील सोन्याच्या किंमतीवर होताना दिसून येत आहे. परंतु सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव घसरले आहेत. मात्र भारतात लग्नसराईची वेळ असल्याने सोन्याच्या भावामध्ये वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावामध्ये 100 ते 300 रुपये प्रती तोळ्याने वाढ होत आहे. तसेच चांदीचे दर सुद्धा एका दिवसात 500 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे चांदीचा सध्याचा बाजारभाव 39,500 रुपये एवढा झाला आहे.