Gold and Silver Rate Today: धनत्रयोदशी दिवशी सोनं खरेदी करणार्यांसाठी दिलासादायक बातमी; मुंबई, पुणे मध्ये 10 ग्राम सोन्यासाठी पहा किती रूपये मोजावे लागणार?
धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा यांचा मुहूर्त साधत यंदा सोनं खरेदी केली जाणार आहे. मग पहा आजचा सोनं चांदीचा दर काय आहे.
वसूबारस (Vasubaras) आणि धनत्रयोदशी (Dhantrayodashi) दिवशी यंदा एकाच दिवशी आल्याने दिवाळीची सुरूवात 25 ऑक्टोबर दिवशी होणार आहे. हिंदू धर्मीयांसाठी मोठा आणि महत्त्वाच्या सणामध्ये धनत्रयोदशी हा एक आहे. यादिवशी धनाची देवता कुबेरराची जयंती (Kuber Jayanti) असल्याने अनेकजण दिवाळसणाची सुरूवात सोने खरेदीने करतात. यंदा धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर कमी झाल्याची माहिती समोर आहे. आज (23 ऑक्टोबर) दिवशी सोन्याच्या दरात सुमारे 30 रूपयांची किरकोळ घट झाल्याची माहिती समोर आली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर पहा महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या प्रमुख शहरांमध्ये काय आहे आजचा सोन्याचा दर?
दिवाळीच्या दिवसात सोनं-चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व असतं. धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा यांचा मुहूर्त साधत यंदा सोनं खरेदी केली जाणार आहे. मग पहा आजचा सोनं चांदीचा दर काय आहे. Diwali 2019: धनत्रयोदशी दिवशी 'या' मुहूर्तावर सोने खरेदी करणे आहे फायदेशीर; जाणून घ्या यामागील महत्व.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये सोन्याचा दर काय?
मुंबई - ₹ 38,510/ प्रति दहा ग्राम
पुणे - ₹ 38,510/ प्रति दहा ग्राम
नाशिक - ₹ 38,510/ प्रति दहा ग्राम
नागपूर - ₹ 38,510/ प्रति दहा ग्राम
चांदीचा दर मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे शहरामध्ये किती?
दिल्लीमध्ये सोनं स्वस्त झालं असलं तरीही चांदीचा दर चढा आहे. त्याच्यामध्ये सुमारे 150 रूपयांची वाढ झाल्याची माहिती आहे. मात्र मुंबईसह राज्यात चांदीचा दर आज घसरला आहे. महाराष्ट्रामध्ये चांदी प्र्ति किलो ₹ 48,100 इतकी आहे.
अमेरिका-चीन यांच्यात सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते अशी माहिती देण्यात आली आहे.
हे दर गुड ₹ रिटर्न्स (Good₹Returns) वेबसाईटनुसार दिले आहेत.