Girls Missing In Maharashtra: 'त्या' साऱ्याजणी गेल्या कुठे? महाराष्ट्रातन 594 मुली बेपत्ता, एकट्या पुण्यातील आकडा 447

ही आकडेवारी पाठिमागच्या अवघ्या काही महिन्यातील आहे. तर राज्यातील पाठिमागच्या तीन महिन्यांतील आकडेवारी पाहिली तर साधारण 16 ते 25 या वयोगटातील 3,594 मुली बेपत्ता झाल्या आहे.

| Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Girls Missing From Pune: महाराष्ट्रातील मुली, महिला अचानक जातात तरी कोटे आणि गायब होतात तरी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील बेपत्ता मुलींची धक्कादायक आकडेवारी नुकतीच पुढे आली आहे. ही आकडेवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. तसेच, मुलींच्या अचानक बेपत्ता होण्यावरुन चाकरणकर (Rupali Chakankar) यांनी राज्याच्या पोलीस प्रशासनाला जाबही विचारला आहे. चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एकट्या पुणे जिल्ह्यातून तब्बल 447 मुली आणि महिला अचानक बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी पाठिमागच्या अवघ्या काही महिन्यातील आहे. तर राज्यातील पाठिमागच्या तीन महिन्यांतील आकडेवारी पाहिली तर साधारण 16 ते 25 या वयोगटातील 3,594 मुली बेपत्ता झाल्या आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशा भागातून पाठिमागच्या तीन महिन्यात 447 मुली बेपत्ता झाल्या आहेत. चाकणकर यांनी ही पत्रकार परिषद मुंबई येते घेतली. संपूर्ण राज्यातून पाठिमागच्या तीन महिन्यात एकूण 5,610 मुली, महिला बेपत्ता झाल्या आहेत. विशेष म्हणजे या महिला आणि मुली सरासरी 16 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जानेवारी 2023 ते मार्च 2023 या कालात पुणे शरातून मुली, महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण या भागातून मुली, महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण किती मोठो आहे हे आकडेवारी पाहिली की लक्षात येते. ही विभागनिहाय ही आकडेवारी खालील प्रमाणे.

पुणे शहर- 148

पिंपरी चिंचवड- 143

पुणे ग्रामीण- 156

मुली, महिला बेपत्ता होण्याच्या आकडेवारीत आणखीही एक बाब महत्त्वाची आहे ती म्हणजे विदेशात नोकरी, कामानिमित्त जाणाऱ्या महिलांची. आकडेवारीदरम्यान असेही लक्षात आले आहे की, नोकरी, व्यवसाय अथवा इतर काही कारणांनी विदेशात गेलेल्या सुमारे 82 महिला, मुलींचा कुटुंबीयांशी संपर्क तुटल्याचे पुढे आले आहे. या महिलांची ओमान, दुबई अथवा इतर काही देशांमध्ये तस्करी केली जात असल्याचा संशय आहे. राज्य महिला आयोगाने हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठवले आहे.