Pune Metro News: पुण्यातील विद्यार्थ्यासाठी मेट्रोकडून खास भेट, 'एक पुणे कार्ड'चे आज होणार लोकार्पण

पुणे मेट्रोने 12 ऑगस्ट रोजी 'एक पुणे कार्ड' या पुणे मेट्रोच्या बहुउद्देशीय कार्डचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केले.

Pune Metro (PC - Wikimedia Commons)

Pune Metro News:  पुणे (Pune) मेट्रोने (Metro) विद्यार्थ्यांसाठी खास भेट दिली आहे. पुणे मेट्रोने 12 ऑगस्ट रोजी 'एक पुणे कार्ड' या पुणे मेट्रोच्या बहुउद्देशीय कार्डचे लोकार्पण  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते केले. या कार्डचे आज लोकार्पण होणार आहे. पुणे मेट्रोने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रीपेड एक पुणे विद्यार्थी पासची सुविधा उपल्बध करण्यात आली आहे. यासाठी पुणे मेट्रोने एचडीएफसी बॅंकेसोबत भागीदारी केली आहे.

मेट्रोच्या प्रवासाबरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते. एक पुणे विद्यर्थी पास देशातील नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) च्या नियमांचे पालन करते. त्यामुळे भारतातील इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये वापरले जाऊ शकते. हे एक स्पर्श विरहित (कॉन्टॅक्टलेस) कार्ड आहे आणि त्यामुळे पेमेंट जलद होते. एक पुणे विद्यर्थी पास सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असेल.

हा पास घेण्यासाठी 13 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याखालील वय असणारे विद्यर्थी हे कार्ड घेऊ शकत नाहीत. 13 ते 18 वर्षे वय असणारे विद्यार्थी पॅन कार्ड नसल्यास एक ई-फॉर्म भरून आपले एक पुणे विद्यर्थी पास कार्ड प्राप्त करू शकतात. आधार कार्ड आणि महाविद्यालय ओळखपत्र असणे गरजेचे आहे. किंवा शचालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक असेल. विद्यार्थ्याला तिकीट दरामध्ये 30 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. या कार्डची वॅलिड 3 वर्षे असून हे कार्ड अहस्तांतरणीय आहे.

पुणे मेट्रोच्या अधिकृत संकेत स्थळावर जावून ई- फॉर्म भरून पास प्राप्त करून शकतो. मेट्रोवर जावून देखील पास प्राप्त करू शकता. या कार्डपासला दिवसातून 20 व्यवहाराची मर्यादा दिली आहे.  सर्वात महत्त्वाचे पहिल्या दहा हजार विद्यार्थ्यांना ‘एक पुणे विद्यर्थी पास’ हे मोफत दिले जाणार आहे. त्यानंतर कार्डची किंमत 150 रुपये आणि वार्षिक शुल्क 75 रुपये असे असेल.