Randy Juan Muller Meets Aaditya Thackeray: घानियन फुटबॉलर रॅन्डी जुआन मुलर याने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची घेतली भेट; लॉकडाउनमुळे मुंबई विमानतळावर अकडलेला असताना युवा सेनेने केली होती मदत
घानियन फुटबॉलर रॅन्डी जुआन मुलर (Randy Juan Muller) याने आज पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भेट घेतली आहे. लॉकडाउनपूर्वी मुलर हा केरळमधील एका क्लबसाठी खेळाण्यासाठी भारतात आला होता
घानियन फुटबॉलर रॅन्डी जुआन मुलर (Randy Juan Muller) याने आज पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भेट घेतली आहे. लॉकडाउनपूर्वी मुलर हा केरळमधील एका क्लबसाठी खेळाण्यासाठी भारतात आला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आले. त्यामुळे मुलर मुंबई विमानतळावरच अडकला होता. त्यावेळी युवा सेनेचे सदस्य राहुल कानल आणि आदित्य ठाकरे यांनी त्याची मदत केली होती. तसेच त्याची मुंबईत राहण्याची व्यवस्था केली. यासाठी मुलरने आदित्य ठाकरे आणि राहुल कनाल यांचे आभार मानले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलर हा लॉकडाउनमध्ये मुंबई विमानतळाच्या कृत्रिम बागांमध्ये आपला वेळ घालवत असे. तसेच स्टॉलवरून खाद्यपदार्थ खेरेदी करायचा आणि विमानतळाच्या कर्मचाऱ्यांसोबत वेळ घालवायचा. त्यावेळी विमानतळावरील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी त्याची खूप मदत केली होती. एका ट्विटर युजरने मुलरची दयनीय अवस्था आदित्य ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुलरची एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. हे देखील वाचा- Building Collapses In Bandra: मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणाला दिली भेट
आदित्य ठाकरे यांचे ट्वीट-
त्यानंतर मुलरने ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि राहुल कानल यांचे आभार मानले होते. विमानतळावर जेव्हा त्याची मुलरसोबत भेट झाली त्यानंतर त्याला आनंदाश्रू अनावर झाले होते. दरम्यान, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (MIAL) त्याला अन्नासह सर्व मदत पुरविली होती. तसेच त्याला कॉल करण्यासाठी एअरपोर्ट वायफाय नेटवर्क वापरण्याची परवानगी दिली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)