Gautami Patil चे कोल्हापूर पाठोपाठ तळकोकणातील कार्यक्रम रद्द; आयोजकांनी दिलं 'हे' कारणं

महाराष्ट्रात अनेकदा तिला पाहण्यासाठी लोकं झाडावर, छप्परावर जाऊन बसत असल्याचं पहायला मिळालं आहे.

Gautami Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

कोल्हापूर नंतर गौतमी पाटीलचे (Gautami Patil) तळकोकणातील नियोजित दोन कार्यक्रम रद्द झाले आहेत. अम्युझमेंट सेंटर कोकण मनोरंजन पर्यटन या संस्थेने कुडाळ आणि कणकवली मध्ये गौतमीच्या कार्यक्रमांचे आयोजान केले होते. पण अनेकांनी तिच्या कार्यक्रमाविरूद्ध नापसंती दाखवल्याने त्या दबावाखाली आता कार्यक्रम रद्द केल्याचं म्हटलं जात आहे. आयोजकांनी तांत्रिक कारणामुळे गौतमीचा डीजे डान्स शो रद्द झाल्याचं सांगितलं आहे. दरम्यान तिच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली नव्हती.

कुडाळ मध्ये गौतमीचा शो ८ ऑक्टोबरला मराठा समाज हॉल येथे सकाळी 11 तर कणकवली येथे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान मध्ये संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला होता. पण आता हे दोन्ही शोज रद्द करण्यात आले आहेत. देवगडच्या अम्युझमेंट सेंटरचे संचालक धैर्यशील पाटील यांच्या नावे जारी प्रसिद्धीपत्रकात त्याची माहिती देण्यात आली आहे. गौतमीचा शो रद्द झाला असला तरीही याच ठिकाणी होणार्‍या "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमाला सिंधुदुर्गात परवानगी देण्यात आली आहे. त्याची तिकीट विक्री नियमित सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

गौतमी पाटीलचा कोल्हापूरातील कार्यक्रम रद्द करताना गणेशोत्सव काळात पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखणं कठीण जाईल असं सांगत तिचे कार्यक्रम रद्द झाले होते. दरम्यान 'सबसे कातिल गौतमी पाटील' अशी ओळख मिरवणार्‍या या नृत्यांगणेची तरूणाईमध्ये क्रेझ आहे. पण डांस दरम्यान काही अश्लिल हावभाव करत असल्याने ती चर्चेत आली होती. Gautami Patil in Mumbai: गौतमी पाटील हिच्यासाठी उतावीळ तरुण वेडापीसा, पब्लिकने स्टेजसमोरच चोपला .

लावणी आणि लोकसंस्कृतीला गौतमीमुळे धक्का बसत असल्याचं काही जुन्या-जाणत्या कलाकारांचं मत आहे. त्यामुळे तिला डोक्यावर घेणार्‍यांइतकीक तिला विरोध करणार्‍यांची देखील संख्या मोठी आहे. तिच्या कार्यक्रमात जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत.