Ganpati Special Train 2021: गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वेकडून 261 गणपती विशेष गाड्या; 20 सप्टेंबर पर्यंत सुरु असणार सेवा

गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे (Indian Railways) 261 गणपती विशेष (Ganpati Special Train 2021) गाड्या विविध ठिकाणांसाठी चालवणार आहे. या गाड्यांसाठी विशेष तिकीट भाडं असणार आहे.

Ganpati Special Train 2021: गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वेकडून 261 गणपती विशेष गाड्या;  20 सप्टेंबर पर्यंत सुरु असणार सेवा
Indian Railways (Photo Credits: I File Image)

गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे (Indian Railways) 261 गणपती विशेष (Ganpati Special Train 2021) गाड्या विविध ठिकाणांसाठी चालवणार आहे. या गाड्यांसाठी विशेष तिकीट भाडं असणार आहे. गणपती विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वे 201, पश्चिम रेल्वे 42, कोकण रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) 18 गाड्या चालवणार आहे. या गाड्यांची सेवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाली असून त्या 20 सप्टेंबर, 2021 पर्यंत धावतील. तसेच, गर्दी कमी करण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या विविध गाड्यांमध्ये स्लीपर क्लासचे डबे वाढवले जातात.

वेळ आणि थांब्यांविषयी सविस्तर माहितीसाठी, प्रवासी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी असेल याची कृपया नोंद घ्यावी. (हेही वाचा, Ganeshotsav 2021Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवात पहा महत्त्वाच्या दिवसांच्या तारखा!)

प्रवाशांनी कृपया आरंभ स्थानापासून प्रवासादरम्यान तसेच गंतव्य स्थानावर कोविड -19 शी संबंधित सर्व नियमांचे, मानक नियमावलीचे पालन करावे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2021 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).