Sharad Mohol: शरद मोहोळच्या अंत्ययात्रेला तरुणांची गर्दी, बाईक-कारची रॅली
यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोहोळ अंत्ययात्रेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
पुण्यात (Pune) सुतारदरा येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची गोळी घालून हत्या करण्यात आली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर रात्री पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शरद मोहोळवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. पुण्याच्या रस्त्यावर समर्थक तरुणांनी आपल्या दुचाकींनी रॅलीच काढली होती. या गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Sharad Mohol Murder CCTV Footage: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचं CCTV फुटेज आलं समोर, पाहा थरकाप उडणारा व्हिडिओ)
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
A post shared by शिवभक्त श्री. शरद हिरामण मोहोळ (@shri_sharad_hiraman_mohol_)
मोहोळच्या अंत्ययात्रेत त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोहोळ अंत्ययात्रेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा एकदा गँगवारची शक्यता असल्याने पोलिसांनी अंत्ययात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त हा ठेवला आहे.
दरम्यान पुणे पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी हत्या करण्यात आली. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. शरद सोबत असणाऱ्या बॉडीगार्डने शरदवर गोळीबार केल्याचे स्पष्ट व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान शरदला एक गोळी डोक्यात आणि एक गोळी छातीत आणि दोन गोळ्या मानेला लागल्या. गोळीबार करताच आरोपी घटना स्थळावरून फरार आहे.या घटनेत शरद रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला.