धक्कादायक! वाशीमध्ये पुरुषावर 5 जणांचा सामुहिक बलात्कार; पार्श्वभागात नारळाची करवंटी घालून शारीरिक छळ

5 जणांनी या पुरुषाचे अपहरण करून त्याच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर त्याच्या पार्श्वभागात नारळाची करवंटी आणि कंडोम घुसवून त्याला सोडून दिले

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

भारत स्त्रियांसाठी सुरक्षित नाही असे नेहमीच बोलले जाते, मात्र आत इथे पुरुषही सुरक्षित नाही असे दिसत आहे. नवी मुंबई (New Mumbai) येथील वाशी (Vashi) परिसरात एका 34 वर्षीय पुरुषावर सामुहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 5 जणांनी या पुरुषाचे अपहरण करून त्याच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर त्याच्या पार्श्वभागात नारळाची करवंटी आणि कंडोम घुसवून त्याला सोडून दिले. याबाबत वाशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत पुरुष सोमवारी सायंकाळी जागृतेश्र्वर तलावाजवळ फेरफटका मारण्यासाठी गेला होता. या ठिकाणी तो फोनवर बोलत असताना 25 ते 30 वयोगटातील 5 जणांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर कांदळवनाच्या झुडुपात नेऊन त्याच्यावर बलात्कार केला. पुढे या आरोपींनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची अर्धवट करवंटी आणि कंडोम टाकून तिथून ते फरार झाले. या सर्व प्रकारात पिडीत पुरुष गंभीररित्या जखमी झाला आहे. एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून शस्त्रक्रियादेखील घडल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा: तीन पोलिसांकडून 65 वर्षीय पुरुषावर लैंगिक अत्याचार; सलग तीन दिवस चालू होता शारीरिक छळ)

दरम्यान, जयपूर येथे देखील अशी एक घटना उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय मुलावर सार्वजनिक शौचालयात दोन पुरुषांनी सामिहिक बलात्कार केला आहे. या मुलाने ट्विट करत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे या मुलाला प्रचंड मानसिक धक्का बसला असून, आता घरातून बाहेर पडण्यास आपण घाबरत असल्याचे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.