Gang Rape in Mumbai Case: सामुहिक बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली; 15 वर्षीय मुलीवर मित्रासह 6 जणांकडून बलात्कार

तेथे या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला आहे.

Rape | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

मुंबई (Mumbai)  शहर पुन्हा सामुहिक बलात्काराच्या (Gang Rape) घटनेने शहर हादरलं आहे. लोअर परेल (Lower Parel) भागामध्ये एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपींमध्ये तिघे जण अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सार्‍या आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी सध्या बालासुधार गृहामध्ये (Juvenile Rehabilitation Centre) करण्यात आली आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार ही घटना शुक्रवारची आहे. पीडीत मुलीचा मित्र तिला घेऊन त्याच्या मित्रांकडे गेला. तेथे या मुलीवर सामुहिक बलात्कार झाला आहे. पोलिसांनी पीडीतेच्या मित्राला आणि त्याच्या मित्रांनाही अटक केली आहे. पीडीतेने तिच्यासोबत झालेली घटना जेव्हा कुटुंबाला सांगितली तेव्हा त्यांनी एनएम जोशी मार्ग पोलिस स्टेशन मध्ये संबंधितांविरूद्ध तक्रार नोंदवली. नक्की वाचा: Gang Rape in Palghar: सोळा वर्षीय मुलीवर 11 जणांकडून सामूहिक बलात्कार; 8 जणांना अटक, पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथील घटना .

पहा ट्वीट

पोलिसांनी पीडीतेच्या जबाबावरून आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एकूण 6 आरोपी अटकेमध्ये आहेत. त्यापैकी अल्पवयीन मुलं सध्या बालसुधार गृहामध्ये आहेत. न्यायालयाकडून आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करून पुरावे गोळा करत आहेत. याप्रकरणी पोक्सो अ‍ॅक्ट अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.