Ganeshotsav 2022: मुंबईच्या GSB Seva Mandal ने गणपती उत्सवासाठी उतरवला तब्बल 316.40 कोटी रुपयांचा विमा

अधिकाऱ्याच्या मते, 316.4 कोटी रुपयांच्या विम्यामध्ये सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू, मंडळ, स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, शू स्टॉलवरील कामगार, पार्किंग कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी, आग आणि भूकंप यांचा समावेश आहे.

GSB Seva Mandal Ganpati | प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits-Facebook)

मुंबईमध्ये (Mumbai) गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2022) सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. यावेळी शहरातील खास मंडळे आणि त्यांच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो लोक भेट देत असतात. मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांवर करोडो रुपये खर्च केले जातात, म्हणूनच गणेश मंडळे आपल्या मंडळाचा विमा काढतात. मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेश मंडळांपैकी एक, जेएसबी सेवा मंडळाने (GSB Seva Mandal) आगामी गणपती उत्सवासाठी 316.40 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.

कोणत्याही मंडळाने घेतलेल्या विम्याची ही सर्वाधिक रक्कम असल्याचा दावा मंडळाच्या प्रतिनिधीने केला. मुंबईच्या किंग्ज सर्कलमधील GSB सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय कामथ यांनी सांगितले की, बुधवारपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या उत्सवासाठी सर्व सार्वजनिक दायित्वे आणि मंडळाला भेट देणार्‍या प्रत्येक भाविकाचा विमा संरक्षित करण्यात आला आहे.

अधिकाऱ्याच्या मते, 316.4 कोटी रुपयांच्या विम्यामध्ये सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू, मंडळ, स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, शू स्टॉलवरील कामगार, पार्किंग कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी, आग आणि भूकंप यांचा समावेश आहे. मंडळ यावर्षी आपला 68 वा गणपती उत्सव साजरा करत आहे. GSB ने यापूर्वी 2016 मध्ये 300 कोटी रुपयांची अशीच मोठी पॉलिसी घेतली होती. हा महागणपती सुमारे 66 किलो सोन्याचे दागिने आणि 295 किलोपेक्षा जास्त चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंनी सजलेला आहे. (हेही वाचा: Andheri Cha Raja 2022: अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी 'हे' कपडे घातले तर भाविकांना प्रवेश मिळणार नाही)

दरम्यान, गणेश उत्सव हा गणेश चतुर्थीपासून सुरू होतो आणि 10 दिवसांनी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला संपतो. यंदा गणेश स्थापनेचा मुहूर्त सकाळी 11.05 ते दुपारी 1.38 पर्यंत आहे. यंदा अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर रोजी येत आहे.