Ganeshotsav 2020: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी ऑनलाईन गणपती विसर्जन करण्याची सोय; ठाणे महानगरपालिकाचे महत्त्वपूर्ण निर्णय

त्यामुळे आता गणेश मुर्तींचे ऑनलाईन पद्धतीने विसर्जन करता येणार आहे.

File image of devotees immersing the Ganesha idol | (Photo Credits: PTI)

कोविड-19 (Covid-19) संकटात गणपती विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) एक नवी योजना सुरु केली आहे. त्यामुळे आता गणेश मुर्तींचे ऑनलाईन पद्धतीने विसर्जन करता येणार आहे. यासाठी डिजीठाणे प्रणालीच्या माध्यमातून ॲानलाईन टाईमस्लॅाट बुकिंग (Online Time Slot Booking) सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी दिली आहे. गणेशोत्सवात नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

उद्या म्हणजेच शुक्रवार, 14 ऑगस्ट पासून ठाणेकरांसाठी ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी www.covidthane.org या महानगरपालिकेच्या अधिकृत डिजीठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन Ganesh Visarjan Booking हा पर्याय निवडा. तेथे तुमच्या प्रभागातील कृत्रिम तलावांची किंवा मुर्ती स्वीकृती केंद्रांची यादी दिसेल. तेथे तुमच्या जवळच्या विसर्जन स्थळाचा टाइमस्लॉट बुक करा. यंदा या योजनेचा लाभ घेत महानगरपालिकेला योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. (BMC कडून समुद्रात गणपती विसर्जन करण्यास मनाई केल्याच्या सोशल मीडिया वृत्ताचे खंडन; असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्टीकरण)

TMC Tweet:

दरम्यान कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसंच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.  गणपती मिरवणूकांना परवानगी नसून आगमन आणि विसर्जनाच्या वेळी केवळ 3 लोक उपस्थित राहु शकतात. पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. शाडू मातीची मुर्ती असल्यास घरच्या घरीच विसर्जन करावे, असेही आयुक्तांनी सांगितले आहे. ठाण्यात 20 ठिकाणी मुर्ती स्वीकृती केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून 13 ठिकाणी कृत्रीम तलावांची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.