Ganesh Utsav Guidelines: गणेशोत्सावासाठी महापालिकेकडून नियमावली जाहीर

त्याचसोबत यंदाही कोरोनाची परिस्थिती असल्याने सण अत्यंत साधेपणाने साजरे करावेत असे आधीच प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Ganesh Jayanti 2020 (Photo Credits: Unsplash)

Ganesh Utsav Guidelines: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सावासाठी सर्वत्र आता लगभग सुरु झाली आहे. त्याचसोबत यंदाही कोरोनाची परिस्थिती असल्याने सण अत्यंत साधेपणाने साजरे करावेत असे आधीच प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. महापालिकेचे गणेशोत्सव मंडळांसोबत सोमवारी एक बैठक पार पडली. त्यानंतर या नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

महापालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, सार्वजनिक मिरवणुक काढण्यावरब बंदी असणार आहे. परंतु समुद्रात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याआधी जाहीर केलेल्या नियमावलीत जसे म्हटले होते की, घरगुती गणपतीची मुर्ती 2 फुट आणि सार्वजनिक गणपतीची उंची ही 4 फूटापर्यंतच असावी त्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त गणपतीच्या विसर्जनासाठी 10 कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली आहे.(Dahi Handi 2021 Celebration In Maharashtra: महाराष्ट्र सरकार कडून यंदा देखील दहीहंडी ला परवानगी नाहीच)

दरम्यान, गेल्या वर्षी जे गणेशोत्सवासाठी नियमावली लागू केली होती तिच यंदाही असणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियम पाळावेत असे सांगण्यात आले आहेच. त्याचसोबत गर्दी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. श्रींच्या विसर्जनासाठी महापालिकेकडून 84 ठिकाणी सोय करुन दिली जाणार आहे.

तर मंडाळाचे 10 कार्यकर्ते हे मंडपापासून ते विर्सजन स्थळापर्यंत मुर्ती घेऊन जातील. विर्सजनाच्या स्थळी मुर्ती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार असून तेच गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करणार आहेत. या व्यतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी शक्यतो ऑफलाईन पद्धतीने दर्शनाच्या परवानगी बद्दल सरकारच्या आदेशाने योग्य निर्णय घेतला जाईल असे पालिकेचे उपायुक्त हर्शद काळे यांनी म्हटले आहे.